शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

विषारी गवतामुळे ११ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

चिचबर्डी हे यवतमाळ लगत असल्याने येथे बहुतांश शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. प्रत्येकाकडे म्हशी, गाई आहे. ओमराज चव्हाण या शेतकऱ्याकडेही दुधाच्या म्हशी व गाई होत्या. आता कपाशीचे पीक शेवटच्या टप्प्यात असल्याने त्यात घरची जनावरे चरण्यासाठी सोडली. २१ जानेवारीपासून काही जनावरांमध्ये शरीरिक त्रास दिसू लागला.

ठळक मुद्देचिचबर्डीतील घटना : दूध उत्पादकाचे चार लाखांचे नुकसान, पशुपालकांत घबराहट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरच्या शेतात नेहमी चरायला जाणाऱ्या जनावरांचा एका पाठोपाठ एक असा मृत्यू झाला. काही समजायच्या आत तब्बल ११ जनावरे ठार झाली. ही घटना नेर मार्गावरील चिचबर्डी येथे घडली. विषाक्त गवत खालल्यामुळे जनावरे दगावल्याचे पशुवैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.चिचबर्डी हे यवतमाळ लगत असल्याने येथे बहुतांश शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. प्रत्येकाकडे म्हशी, गाई आहे. ओमराज चव्हाण या शेतकऱ्याकडेही दुधाच्या म्हशी व गाई होत्या. आता कपाशीचे पीक शेवटच्या टप्प्यात असल्याने त्यात घरची जनावरे चरण्यासाठी सोडली. २१ जानेवारीपासून काही जनावरांमध्ये शरीरिक त्रास दिसू लागला. स्थानिक पशुवैद्यकीय यांना जनावरे दाखविली. मात्र पायझनिंगचा प्रकार आहे एवढेच सांगण्यात आले. एका पाठोपाठ एक अशी जनावरे दगावण्यास सुरुवात झाली. दुधाच्या चार म्हशी ठार झाल्या. पाच वगारी, एक हल्या व एका कालवडीचा सुद्धा यात समावेश आहे. आठ दिवसात चार लाखांचे पशुधन नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली. शिवाय गावातील इतर पशुपालकांमध्येही दहशत निर्माण झाली.नेमकी जनावरे कशामुळे दगावतात याचा शोध घेतला असता विषाचा अंश असलेले गवत शेतामध्ये आढळून आले. या गवताला बोली भाषेत छोटा मीरा, ढोर काकडा असे संबोधतात. गर्द हिरव्या रंगाचे हे गवत जनावरांना आकृष्ट करते. या गवताला जांभळ्या रंगाची फुलं येतात. गवतात विषाचा अंश असल्याने जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास जनावरे दगावतात. ओमराज चव्हाण यांच्या कपाशीच्या शेतात ओलितामुळे मोठ्या प्रमाणात छोटा मीरा हे गवत उगवल्याचे दिसून येते. चिचबर्डी येथील इतरही शेतकऱ्यांच्या शेतात हे गावत उगवले आहे. मात्र वेळीच सावध होवून जनावरांना छोटा मीरा गवत असलेल्या शेतात सोडणे बंद केले.अशी आहेत लक्षणेछोटा मीरा, ढोर काकडा हे गवत खाण्यात आल्यास जनावर रवंथ करण थांबवितात. त्यानंतर लाळ गाळते. जनावराच्या शारीराला कंप सुटतो. ते थरथर कापते. जनावराची शौच व लघवी बंद होते. पोट फुगून जनावराचा मृत्यू होतो. बºयाचदा जनावराची मानही वाकडी होते. ही या गवतामुळे झालेल्या विषबाधेची लक्षणे आहे.बोली भाषेत छोटा मीरा संबोधल्या जाणाºया गवतामध्ये अ‍ॅक्झालिक पॉयझन असते. या गवताचे सेवन केल्यानंतर जनावरांना विषबाधा होते. चिचबर्डी येथील जनावरांचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविले आहे. लक्षणावरून जनावरांचा अ‍ॅक्झालिक पॉयझनिंगमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.- डॉ.भावना झाडेपशुधन विकास अधिकारीफिरता दवाखाना

टॅग्स :Farmerशेतकरी