शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

विषबाधेचा रुग्ण शंभर टक्के ठणठणीत बरा होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:00 IST

योग्य उपचारानंतर विषबाधितांच्या शरीरात विषाचा कोणताही अंश राहत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही विषबाधेची नसून औषधांची असू शकतात.

ठळक मुद्देगरज समुपदेशनाची : उपचारानंतरच्या लक्षणांनी घाबरु नका, तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : योग्य उपचारानंतर विषबाधितांच्या शरीरात विषाचा कोणताही अंश राहत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही विषबाधेची नसून औषधांची असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. विषबाधेचा रुग्ण हा शंभर टक्के ठणठणीत बरा होतो, असे विषबाधित रुग्णांवर उपचार करणाºया खासगी व शासकीय तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगतिले.यवतमाळ जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून १९ जणांचा बळी गेला. चारशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ही मंडळी आता आपल्या गावी गेली आहे. त्यातील अनेक रुग्णांना अशक्तपणा, हातापायाला थरकाप सुटणे, भोजन कमी होणे, दृष्टी तात्पुरती अधू होणे, अंगदुखी आणि मळमळ होऊन उलटी होणे आदी लक्षणे दिसत आहे. आपल्या अंगात विषाचे अंश असतील आणि त्यामुळेच ही लक्षणे दिसत आहे, असे समजून रुग्णांसह घरची मंडळीही घाबरून गेली आहे. कोणतेही माहिती नसल्याने रुग्ण पराकोटीचे दडपणाखाली आहे. परंतु ही लक्षणे विषबाधेची नसून उपचारादरम्यान दिलेल्या औषधाचे असतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘लोकतम’शी बोलताना सांगितले. विषबाधेचा आघात मानवी चेता संस्था (न्युरोमस्क्यूलर) आणि स्नायूवर होतो. हृदयाची गतीही कमी होते. ही गती कायम ठेवण्यासाठी रुग्णाला अ‍ॅट्रोफिन हे औषध दिले जाते. या औषधाचा परिणाम बराच काळ शरीरावर राहतो. रुग्ण घरी गेल्यानंतर काही लक्षणे दिसू लागतात. परंतु घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. विषबाधित रुग्ण हा ठणठणीत बरा होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच विषबाधितांना अ‍ॅन्टी डोज म्हणून पाम ही औषधी दिली जाते. अलिकडच्या काळात या औषधीचा प्रभाव कमी दिसून येत आहे. त्यामुळे अनेकदा ही औषधी प्रभावी ठरत नाही.यवतमाळातील जनरल फिजीशियन डॉ. दीपक अग्रवाल म्हणाले, उपचारानंतर शरीरात विषाचा कोणताही अंश राहणे शक्य नाही. आपले शरीर संपूर्ण विष बाहेर टाकते. तसेच किडणी, यकृत, पचनसंस्था आदी अवयवांवर विषबाधेचा परिणाम होण्याचीही शक्यता नगन्य असते. रुग्णांनी आणि नातेवार्इंकानी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. त्रास मोठ्या प्रमाणात जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे डॉ.अग्रवाल यांनी सांगितले.मानसिक आधार हवाविषबाधा झालेले रुग्ण घरी गेल्यानंतर अनेकदा रुग्णांना झटके येतात. परंतु हे झटके विषबाधेचे नसतात. तंबाखू अथवा दारूचे व्यसन असणाºयांत असे लक्षण दिसते. दवाखान्यात उपचारादरम्यान तंबाखू आणि दारू वर्ज्य असते. त्यामुळे निकोटीन किंवा अल्कोहोल विड्रॉलचे झटके येतात. काहींना अस्वस्थ वाटू शकते. परंतु घाबरण्याचे कोणतेही कारण नसते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.बळीराजा चेतना अभियानाचे वराती मागून घोडेजिल्ह्यात फवारणीचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता शासकीय यंत्रणेसह बळीराजा चेतना अभियान शेतकºयांना फवारणीचे ‘शास्त्रशुद्ध’ मार्गदर्शन करीत आहे. हा प्रकार म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असाच आहे. साधारणत: जुलै महिन्यापासून फवारणीला प्रारंभ होतो. त्याच काळात विषबाधा झाल्याचे पुढे आले. नंतरच्या काळात १९ जणांचा बळी गेला तर चारशेच्यावर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली. तोपर्यंत कोणत्याही शासकीय यंत्रणेचे फवारणीकडे लक्ष नव्हते. विशेष म्हणजे खास शेतकºयांसाठी स्थापन झालेल्या बळीराजा चेतना अभियानही यापासून अनभिज्ञ होते. सर्वप्रथम ‘लोकमत’ने फवारणीतील विषबाधेचा विषय मांडला होता. त्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. आता जो तो शेतकºयांना फवारणीसाठी मार्गदर्शन करीत आहे. परंतु सुरुवातीच्या काळातच फवारणीबाबत मार्गदर्शन केले असते तर १९ जणांचा बळी गेला नसता. बळीराजा चेतना अभियानानेही या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्षच केले. आता फवारणीच्या मार्गदर्शनापेक्षा शेतकºयांना समूपदेशनाची गरज आहे. मात्र जो तो पाठीवर पंप घेऊन शेतकºयांना फवारणीचे मार्गदर्शन करीत आहेत.फवारणीतून असो की कोणत्याही विषबाधेत रुग्णांवर योग्य उपचार झाल्यास तो ठणठणीत बरा होतो. विषबाधेचे कोणतेही दीर्घकालीन परिणाम रुग्णांच्या शरीरावर होत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही काही काळापुरतीच असतात. हळूहळू ती कमी होऊन रुग्ण बरा होतो. तसेच विषबाधेचा उपचार फार महागडाही नसतो. या काळात रुग्णांना समजून घेऊन त्यांना धीर देणे गरजेचे आहे.- डॉ. सचिन बेलेअतिदक्षता उपचार तज्ज्ञ यवतमाळ