शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या भांडणात एकाला पाजले विष, तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 05:00 IST

घाटाना येथील अंकुश जाधव आणि संजय दासू चव्हाण (२५) रा. लोणी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. २२ मार्च रोजी अंकुश घाटाना शेतशिवारात गेला असता संजयने आपल्या अन्य चार साथीदारांसह त्याला शेतशिवारात गाठले. अंकुशचे हातपाय पकडून त्याला बळजबरीने विष पाजले. नातेवाईकांनी त्याला तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात भरती केले. मात्र शुक्रवारी  त्याचा मृत्यू झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : जुन्या वादातून तरुणांमध्ये भांडण पेटले. यात पाच जणांनी मिळून एका तरुणाला बळजबरीने विषारी औषध पाजले. हा गंभीर प्रकार तालुक्यातील घाटाना येथे घडला. विष पोटात गेल्याने तडफडणाऱ्या तरुणाला कसेबसे रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात आले. मात्र डाॅक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही त्याचा मृत्यू झाला. अंकुश विजय जाधव (२८) रा. घाटाना ता. यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी संजय दासू चव्हाण, चेतन संजय चव्हाण (२५), चिरंजीव संजय चव्हाण (२०), रोशन मनोज चव्हाण (२२) आणि करण मनोज चव्हाण (२०) रा. लोणी या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. घाटाना येथील अंकुश जाधव आणि संजय दासू चव्हाण (२५) रा. लोणी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. २२ मार्च रोजी अंकुश घाटाना शेतशिवारात गेला असता संजयने आपल्या अन्य चार साथीदारांसह त्याला शेतशिवारात गाठले. अंकुशचे हातपाय पकडून त्याला बळजबरीने विष पाजले. नातेवाईकांनी त्याला तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात भरती केले. मात्र शुक्रवारी  त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे, एसडीपीओ संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पवन राठोड, पीएसआय भास्कर दरणे, धनंजय शेकदार, गणेश आगे, नीलकमल भोसले, अक्षय डोंगरे यांनी केली. 

 खुनाला गावगाड्यातील वादाची किनार - या प्रकरणी अंकुशचे वडील विजय रामलाल जाधव (५१) रा. घाटाना यांनी वडगाव जंगल पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सुरुवातीला या प्रकरणात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३०७ नुसार गुन्हा नोंदविला गेला. मात्र अंकुशचा मृत्यू झाल्याने आता यात ३०२ हे खुनाचे कलमही दाखल करण्यात आले आहे. - अंकुशला मारणारे पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. गावगाड्याचा वाद विकोपाला गेल्याने प्रकरण खुनापर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी