‘वायपीएस’मध्ये ‘कविता सुनाओ’ स्पर्धा
By Admin | Updated: September 24, 2016 02:43 IST2016-09-24T02:43:52+5:302016-09-24T02:43:52+5:30
येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शाळेंतर्गत ‘हिंदी कविता सुनाओ’ स्पर्धा घेण्यात आली.

‘वायपीएस’मध्ये ‘कविता सुनाओ’ स्पर्धा
यवतमाळ : येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शाळेंतर्गत ‘हिंदी कविता सुनाओ’ स्पर्धा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंशू देहलिया, योगिता कडू यांची उपस्थिती लाभली होती.
या स्पर्धेत तनिष्का फुटाणे, मंदार पांडे, सौम्या बोरखडे, अनुष्का ढवळे, माधव सूचक या विद्यार्थ्यांचा स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन मंजू साहू यांनी केले. आभार शीतल सवाये यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्रभारी प्राचार्य अर्चना कढव आदींनी कौतुक केले.