‘पीएमजीएसवाय’चा कारभार अमरावतीहून
By Admin | Updated: May 18, 2016 02:40 IST2016-05-18T02:40:57+5:302016-05-18T02:40:57+5:30
पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा यवतमाळ जिल्ह्याचा कारभार अमरावतीवरून चालविला जात आहे.

‘पीएमजीएसवाय’चा कारभार अमरावतीहून
यवतमाळ : पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा यवतमाळ जिल्ह्याचा कारभार अमरावतीवरून चालविला जात आहे. मुळात काम नसल्याने आधीच या विभागावर मरगळ आली आहे. त्यात पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कार्यालयातील यंत्रणा वाऱ्यावर सुटल्यागत आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला जिल्हास्तरावर कार्यकारी अभियंता हे प्रमुख आहेत. परंतु येथील पद रिक्त असल्याने अमरावतीचे समकक्ष अभियंता जवंजाळ यांना यवतमाळचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. वास्तविक यवतमाळच्या जागेवर अकोला येथील कार्यकारी अभियंता अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते या साईड पोस्टसाठी इन्टरेस्टेड नाहीत. म्हणून अमरावतीकडे अतिरिक्त प्रभार सोपविला गेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)