मारेगाव सेतू केंद्रात शेतकºयांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:10 IST2017-09-01T22:08:06+5:302017-09-01T22:10:32+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीचे अर्ज सेतू केंद्रावरून आॅनलाईन अर्ज भरताना .....

मारेगाव सेतू केंद्रात शेतकºयांची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीचे अर्ज सेतू केंद्रावरून आॅनलाईन अर्ज भरताना होत असलेली शेतकºयांची आर्थिक लूट व मानसिक त्रास थांबवावा, अशी मागणी तालुका काँग्रेस व तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
कर्जमाफीचे हे अर्ज भरताना शेतकºयांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट आदेश सेतू चालकांना असतानाही शेतकºयांना १०० ते ५०० रूपयांची मागणी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या संगणक चालकाकडूनही यासाठी पैसे आकारण्यात येत आहे. त्यामुळे खासगी सेतू केंद्र व ग्रामपंचायतीच्या संगणक आॅपरेटरची चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकºयांना काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत आहे. त्यातच फॉर्म भरण्यासाठी शुल्क व मानसीक त्रास होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी त्यांना दिवसभर ताटकळत राहावे लागते. त्यामुळे शेतकºयांचा विचार करून होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल देरकर, रवींद्र धानोरकर, शंकर मडावी, दुष्यंत जयस्वाल, यादव काळे, गौरीशंकर, नंदेश्वर आसूटकर, नवीन बावणे, आकाश बदकी आदींनी केली आहे.