शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खत कंपन्यांचा डाव? स्वस्त खत गायब : डीएपीचा तुटवडा; शेतकरी त्रस्त!

By रूपेश उत्तरवार | Updated: June 18, 2025 12:47 IST

डीएपी खताचा अपुरा पुरवठा : युरिया मिळणे झाले अवघड

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खत विक्रेत्यांच्या तक्रारीनंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी खत विक्रीस लिंकिंग करू नये, असे आदेश दिले. यावर सुरुवातीला सहमती दर्शवणाऱ्या खत कंपन्यांनी आता मात्र धोरणात बदल करत राज्यभरात डीएपी आणि युरिया खताचा पुरवठा कमी केला आहे. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची पेरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

गतवर्षीपर्यंत डीएपी व युरिया खरेदी करताना शेतकऱ्यांना नॅनो खत, मायक्रोन्युट्रिएंट्स, कीडनाशके किंवा इतर उत्पादनांची खरेदी बंधनकारक होती. ही 'लिंकिंग' पद्धत अनावश्यक आणि खर्चीक ठरत होती. परिणामी, शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दड पडत होता. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांचा रोष थेट विक्रेत्यांवर होता. अखेर विक्रेत्यांनीच आवाज उठवत कृषिमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. मंत्र्यांनी तत्काळ बैठक घेत खत कंपन्यांना लिंकिंग थांबवण्याचे स्पष्ट आदेश दिले.

डीएपी ३५० रुपयांनी स्वस्तइतर खताच्या तुलनेत डीएपी खत ३५० रुपयाने स्वस्त आहे. इतर खतांसाठी एका पोत्याला १७०० रुपये मोजावे लागतात, तर डीएपीच्या ५० किलोच्या पोत्यासाठी १३५० रुपये मोजावे लागतात. यातून शेतकऱ्यांनी डीएपी खताची मागणी आहे. मात्र, खत कंपन्यांनी या खताचाच पुरवठा कमी केला आहे. यातून शेतकऱ्यांच्या पेरण्या अडचणीत येणार आहे.

"हा प्रकार अधिक गंभीर आहे. संपूर्ण राज्यात निम्म्या खताचाच पुरवठा कंपन्यांनी केला आहे. लिंकिंगकरिता या कंपन्यांनी शेतकरी आणि कृषी केंद्र चालकांना वेठीस धरले आहे. याविरोधात बुधवारी कृषी संचालकांची भेट घेतली जाणार आहे."- विनोद तराळ, अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर सीडस् असोसिएशन, पुणे

टॅग्स :farmingशेतीFertilizerखतेYavatmalयवतमाळ