शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘दिव्यांग’ शिक्षकांची यंदा तरी पडताळणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:04 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गेल्यावर्षी अपंग शिक्षकांच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी झाली नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. आता यंदाच्या बदली प्रक्रियेत तरी अपंगत्व प्रमाणपत्रांची आधी पडताळणी करा आणि नंतरच बदली प्रक्रिया राबवा, अशी मागणी करीत अन्यायग्रस्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली.

ठळक मुद्देबदल्यांची घाई सुरू : गेल्या वर्षीच्या अन्यायग्रस्त शिक्षकांची जिल्हा परिषदेत धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदशिक्षकांच्या बदल्यांमध्ये गेल्यावर्षी अपंग शिक्षकांच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी झाली नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. आता यंदाच्या बदली प्रक्रियेत तरी अपंगत्व प्रमाणपत्रांची आधी पडताळणी करा आणि नंतरच बदली प्रक्रिया राबवा, अशी मागणी करीत अन्यायग्रस्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली.आॅनलाईन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी आधी अर्ज भरले. त्यानंतर त्यांची कागदपत्रे प्रशासनाने गोळा केली. गेल्या वर्षीच्या या उफराट्या कारभाराने अनेक ‘बोगसां’नी संवर्ग १ मधून बदलीचा लाभ घेतला.तर त्यांनी ‘खो’ दिल्यामुळे विस्थापित झालेले शिक्षक रॅन्डम राऊंडमध्ये वाट्टेल त्या गावात फेकले गेले. हीच स्थिती यंदाच्या आॅनलाईन प्रक्रियेतही उद्भवू नये, म्हणून अन्यायग्रस्त शिक्षक चिंताग्रस्त आहेत.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुढाकारात शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. संवर्ग एकमधून अर्ज भरणाऱ्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पंचायत समिती स्तरावरच काटेकोर तपासणी करावी. त्यानंतरच संवर्ग एकची अद्ययावत यादी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच सर्वच संवर्गातील शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी, जिल्हाभरातील मुख्याध्यापक, विषय शिक्षक, सहायक शिक्षक यांच्या रिक्त जागांची पंचायत समितीनिहाय यादी तातडीने जाहीर करावी. ही यादी आली तरच बदली प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.जोडीदारांना जवळ आणागेल्या वर्षी संवर्ग चारमध्ये मोडणारे पती-पत्नी शिक्षक दूरवरच्या शाळेत फेकले गेले. ३० किलोमीटरची अट पाळताना अनेक जोडीदार ३० किलोमीटरपेक्षाही दूरच्या शाळेत गेले आहेत. यंदाच्या प्रक्रियेत अशा विभक्तीकरण लादले गेलेल्या जोडीदारांना ३० किलोमीटरच्या आतील शाळांमध्ये प्राधान्याने बदली द्यावी, अशी मागणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक