पोलीस पाटलाच्या हत्त्येची चौकशी करा

By Admin | Updated: July 7, 2015 01:59 IST2015-07-07T01:59:48+5:302015-07-07T01:59:48+5:30

यावली (कारेगाव) येथील पोलीस पाटील वीरेंद्र नामदेव राठोड यांच्या हत्त्येची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Please inquire about the murder of Police Patola | पोलीस पाटलाच्या हत्त्येची चौकशी करा

पोलीस पाटलाच्या हत्त्येची चौकशी करा

पोलीस अधीक्षकांना निवेदन : राज्य पोलीस पाटील असोसिएशन
हिवरी : यावली (कारेगाव) येथील पोलीस पाटील वीरेंद्र नामदेव राठोड यांच्या हत्त्येची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनतर्फे पोलीस अधीक्षकांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
वीरेंद्र राठोड यांची घेतलेल्या दारूबंदीच्या ठरावातूनच त्यांची दारू माफियांनी कट रचून हत्या केली. मात्र या घटनेतील आरोपी अजूनही फरार आहे. त्यांना शोधून खुनाचा गुन्हा दाखल करावा, मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि दारूची वाहतूक करणाऱ्यांना अटक व्हावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. असोसिएशनचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे, उपाध्यक्ष लोपचंद राठोड, राज्य सहसचिव अशोक वैरागडे आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी वीरेंद्र राठोड यांच्या कुटुंबाची भेट घेतली. (वार्ताहर)

Web Title: Please inquire about the murder of Police Patola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.