नेर येथे सखी मंचतर्फे वृक्षारोपण
By Admin | Updated: July 26, 2016 00:09 IST2016-07-26T00:09:18+5:302016-07-26T00:09:18+5:30
लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच नेरच्यावतीने येथील सोमेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

नेर येथे सखी मंचतर्फे वृक्षारोपण
नेर : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच नेरच्यावतीने येथील सोमेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तत्पूर्वी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवा आदी प्रकारच्या घोषणा देत शहराच्या विविध भागातून रॅली मार्गक्रमण करीत होती. प्रत्येक महिलेने एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.
सोमेश्वर मंदिर परिसरासह विविध ठिकाणी २०० वृक्षांचे रोपण सखी मंचतर्फे करण्यात आले. सोबतच डॉक्टर डेनिमित्त रोपटे देऊन डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमात सखी मंच सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यशस्वीतेसाठी लोकमत सखी मंचच्या शोभा कोठारी, पूजा गुगलिया, श्रद्धा सोईतकर, डॉ. सरिता चेर, डॉ. विद्या इंगळे, वीणा खोडवे, रश्मी गुगलिया, इंदू इंगोले, प्रियंका लोढा, प्रिया कहाते, सारिका इंगोले, वर्षा ठाकरे, धनश्री पिंगळे आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)