प्रयासतर्फे दर्डानगरमध्ये वृक्षारोपण

By Admin | Updated: June 29, 2016 02:37 IST2016-06-29T02:37:17+5:302016-06-29T02:37:17+5:30

येथील दारव्हा रोडवरील दर्डानगरात प्रयास संस्थेकडून वृक्षारोपण करण्यात आले. मागील दोन वषार्पासून हा उपक्रम कार्यान्वीत केलेला आहे.

Plantation in Dardanagar by Prayas | प्रयासतर्फे दर्डानगरमध्ये वृक्षारोपण

प्रयासतर्फे दर्डानगरमध्ये वृक्षारोपण

यवतमाळ : येथील दारव्हा रोडवरील दर्डानगरात प्रयास संस्थेकडून वृक्षारोपण करण्यात आले. मागील दोन वषार्पासून हा उपक्रम कार्यान्वीत केलेला आहे.
या उपक्रमामुळे हजारो झाडे लागली आहेत. वृक्षारोपणानंतर त्याचे संवर्धनसुद्धा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात दर दोन-तीन दिवसांनी लावलेल्या झाडांना पाणी देण्यात आले. यवतमाळला हरितमाळ बनविण्याचे लक्ष्य ठेवून हे कार्य करण्यात येत आहे. सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत ३२ रोपटे लावण्यात आले. यावेळेस यवतमाळ नरगपरिषदचे माजी मुख्याधिकारी बलवंत चिंतावार, अ‍ॅड. दीपक चांभारे, मिलिंद गुंडावार, सुरेश भास्करवार, लायंस क्लबचे अध्यक्ष विजय लाहोटी, सचिव विजय कोरीया, आर्ट आफ लिव्हींगचे निरज जयस्वाल, प्रयासचे डॉ. विजय कावलकर, डॉ. आलोक गुप्ता, डॉ. चेतन दरणे, वृक्षारोपण मोहिमेचे प्रभारी वसंत उपगनलावार, डॉ. केदार राठी, डॉ. सुधा राठी, प्राची बनगीनवार, संध्या काळे, मंगेश खुने, नंदकिशोर गोळे, आशीष देशमुख, मारोती कुचनकर, अनिल कुबडे, कैलास राठोड, संदीप शिवरामवार, प्रशांत बनगीनवार, प्रशांत परसोडकर, विजय देऊळकर, सागर भास्करवार, सुरेश भास्करवार, विजय मुंधडा, दिलीप नाल्हे, अमोल साखरकर, साहेबराव साखरकर, प्रफुल्ल धोटे, विजय आष्टीकर, कापसे, प्रतीक गिरी, अश्विन सव्वालाखे, लोढा, पियूष वाघ, अभिषेक भोंडे, रामेश्वर काळे, आदी उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी विजय खोरीया यांनी १५, निरज जयस्वाल ८, अ‍ॅड. चांभारे ५ आणि प्रयासने ४ झाडे दिली. कार्यक्रमासाठी मिलिंद गुंडावार यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)

Web Title: Plantation in Dardanagar by Prayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.