घाटंजी येथे ठिकठिकाणी वृक्षारोपण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:51 IST2021-09-07T04:51:04+5:302021-09-07T04:51:04+5:30

घाटंजी : येथील पोलीस स्टेशन, अंबानगरी, नेहरूनगर आदी ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. वंचित बहुजन युवक आघाडीच्या ...

Plantation campaign at various places at Ghatanji | घाटंजी येथे ठिकठिकाणी वृक्षारोपण मोहीम

घाटंजी येथे ठिकठिकाणी वृक्षारोपण मोहीम

घाटंजी : येथील पोलीस स्टेशन, अंबानगरी, नेहरूनगर आदी ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली.

सध्या कोरोनाचे संकट कायम आहे. या संकटापासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी निसर्गाची साथ हवी आहे. त्यामुळे वृक्षारोपण करून वृक्षबंधन करण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये वृक्षबंधन कार्यक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक बबनराव कराळे, सहायक पोलीस निरीक्षक विलास सिडाम, सुनील केवट, वामन जाधव, शेख जुनेद, संदीप गोहणे, शेख असिफ, संजय चव्हाण, भाऊ वाकोडे, संजय डोईजड, राजेश्वर दाभेकर, देवानंद बन्सोड, संघपाल कांबळे, दिनेश अक्कलवार, संजय कांबळे, गजू माकडवार, विक्की मानकर, दीक्षांत वासनिक, साहील रामटेके, गौरव शेंडे, शुभम महाजन, आदेश कुंटलवार, शंतनू वानखडे, शुभम नगराळे, सिद्धांत जिवने, आदेश कुंटलवर आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation campaign at various places at Ghatanji