जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:03 IST2019-06-29T22:03:09+5:302019-06-29T22:03:28+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात दुपारी १२ वाजता हा उपक्रम पार पडणार आहे.

जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबीर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात दुपारी १२ वाजता हा उपक्रम पार पडणार आहे.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रासेयो पथक आणि लोकमत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. शिबिरात रक्तसंकलनासाठी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी विभागाच्या चमूचे सहकार्य लाभणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जाते. २ जुलैला रक्तदान शिबिर दुपारी ५ वाजतापर्यंत चालणार आहे. अधिक माहितीसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड (९५११६४८४८८), प्रा. मिलिंद लाभशेटवार (९८८१३१२४००) यांच्याशी संपर्क करावा, असे कळविले आहे.