शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

२१ लाख तरुणांच्या लसीकरणाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, नगरपरिषद आदी फ्रन्ट लाईन वर्करला पहिल्या टप्प्यात लस दिली गेली. आता ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. तर १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. या वयोगटात जवळपास २१ लाख तरुण आहेत. 

ठळक मुद्दे२८४ केंद्र : १८ ते ४५ वयोगट ‘टार्गेट’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग आलेला असतानाच आता १८ ते ४५ या वयोगटातील तब्बल २१ लाख तरुणांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून जिल्ह्यात २८४ लसीकरण केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, नगरपरिषद आदी फ्रन्ट लाईन वर्करला पहिल्या टप्प्यात लस दिली गेली. आता ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. तर १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. या वयोगटात जवळपास २१ लाख तरुण आहेत. सध्या जिल्ह्यात १३० लसीकरण केंद्र असून त्यात ११२ शासकीय व १८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. १ मेपासून त्यात वाढ केली जाणार आहे. ग्रामीण भागात २३० तर शहरी भागात वाढीव ३८ केंद्र सुरू केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे १६ मोबाईल टीमही कार्यरत केल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचेही नियोजन केले जात आहे. लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तर कोविन ॲप हातळण्यासाठी शिक्षक व अन्य कर्मचारी मानधनावर नेमले जाणार आहे. वाढीव लोकसंख्येसाठी वाढीव लसीकरण केंद्राची सोय केली जात आहे.  प्रत्येक केंद्रावर रोज शंभर या प्रमाणे २८४ केंद्रावर एका दिवसात २८ हजार नागरिकांचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला लसीचा पुरवठा उपलब्ध व्हावा याकरिता पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. सुभाष ढोले यांनी सांगितले. 

सव्वादोन लाख लोकांचे लसीकरण आटोपले  जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख २५ हजार १४४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  आरोग्य यंत्रणेतील १७ हजार ३२१ जणांना पहिला तर आठ हजार ४८८ जणांना दुसराही डोस मिळाला.  २३ हजार १७८ फ्रन्ट लाईन वर्करला पहिला तर सात हजार ८९ जणांंना दुसरा डोस मिळाला. ४५ वर्षावरील एक लाख ५६ हजार ४८१ जणांना पहिला डोस तर १२ हजार ५८७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 

पाटीपुरा केंद्र ठरले लसीकरणात अव्वल यवतमाळ शहरातील पाटीपुरा प्राथमिक केंद्रावर सर्वाधिक १३ हजार ७५० लसीकरण आटोपले. त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात नऊ हजार ७००, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९ हजार १५०, उमरखेड ग्रामीण रुग्णालयात ८ हजार ६२०, पुसद उपजिल्हा रुग्णालयात सात हजार ९७० तर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात सात हजार ३५० जणांचे लसीकरण आटोपले. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस