जिल्ह्यातील १,७०० कोटींच्या कर्जाचे नियोजन
By Admin | Updated: May 2, 2015 01:59 IST2015-05-02T01:59:01+5:302015-05-02T01:59:01+5:30
पिककर्जासह शेतकऱ्यांना मुदतीकर्ज तसेच विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी विविध बँकांकडून दरवर्षी कर्ज वितरीत केल्या जाते.

जिल्ह्यातील १,७०० कोटींच्या कर्जाचे नियोजन
यवतमाळ : पिककर्जासह शेतकऱ्यांना मुदतीकर्ज तसेच विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी विविध बँकांकडून दरवर्षी कर्ज वितरीत केल्या जाते. यावर्षी बँकांनी जिल्ह्यात एक हजार सातशे ७०४ कोटींच्या पिककर्ज वितरणाचे नियोज केले आहे. या कर्ज वितरणाचा दरवर्षी वार्षिक आराखडा केल्या जात असतो. या आराखड्या प्रमाणे गेल्या वर्षी जिल्ह्यात एकूण दोन हजार २४ कोटींंच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. या वितरणात सर्वाधिक ४६६ कोटींचा वाटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा होता.
गेल्यावर्षी पिककर्ज व मुदती कजार्साठी एक हजार ९४८ कोटींचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक हजार ११३ कोटी रुपयांचे वितरण झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांसाठी कर्ज वितरणाला १२५ कोटीची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र ३४२ कोटींचे वितरण करण्यात आले आहे. अनेकजन छोट्यामोठ्या व्यवसाय, दुकानासाठी कर्ज घेतात यात किराणा, स्टेशनरी, दुध भांडार, कापड व्यवसाय यासारख्या छोट्या व्यवसायांचा समावेश आहे.
या व्यवसायांकरीता गेल्या वर्षीच्या आराखड्यात ५२५ कोटींचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात ५६९ कोटी रुपये यासाठी कर्ज म्हणून वितरीत करण्यात आले आहे.
घर, शिक्षण आदी स्वरुपाच्या कर्जाचाही यात समावेश आहे. गेल्या वर्षीच्या आराखड्याप्रमाणे दोन हजार ५९८ कोटींचे नियोजन असतांना दोन हजार २४ कोटींच्या कजार्चे वितरण करण्यात आले आहे.
२०१५-१६ या वर्षीचा कर्ज वितरणाचा आराखडा नुकताच जाहिर करण्यात आला. त्याप्रमाणे यावर्षी कृषी व व्यवसायासाठी दोन हजार ८२७ कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पिक कजार्साठी एक हजार ७०४ तर शेतकऱ्यांना मुदती कजार्साठी ४४ कोटींचा समावेश आहे. आराखड्याप्रमाणे सहकारी व राष्ट्रीयकृत बॅकांना त्यांच्या शाखानिहाय कर्ज वाटपाचे
नियोजन करुन देण्यात आले
आहे.
त्याप्रमाणे वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकांना करण्यात आल्या आहे. यावर्षी सुध्दा सर्वाधिक वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)