शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा प्लॅन

By admin | Updated: January 10, 2015 23:02 IST

शहरात ३ ते ९ जानेवारी पर्यंत अतिक्रमण हटाओ मोहीम राबवून त्यात सुमारे ७५० दुकाने भूईसपाट करण्यात आली. या बेरोजगार झालेल्या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा विचार प्रशासकीयस्तरावर

यवतमाळ : शहरात ३ ते ९ जानेवारी पर्यंत अतिक्रमण हटाओ मोहीम राबवून त्यात सुमारे ७५० दुकाने भूईसपाट करण्यात आली. या बेरोजगार झालेल्या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा विचार प्रशासकीयस्तरावर सुरू आहे. त्यासाठी शहरातील ई वर्ग-शासकीय जमिनींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.अतिक्रमण हटाओ मोहिमेत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने हटविली गेली. त्यामुळे हजारो संसार उघड्यावर आले. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षानुवर्षे चालणारा रोजगार अतिक्रमण मोहिमेत अचानक नष्ट झाल्याने या परिवारांवर संकट कोसळले आहे. मात्र त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी यवतमाळ शहरातील रिक्त आणि वापरात येऊ शकतील अशा शासकीय जमिनींची यादी सादर करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले आहे. या जागा शोधून त्यावर तातडीने काय उपाययोजना करता येते किंवा पर्याय म्हणून ही जागा देता येऊ शकते का, याचा विचार केला जात आहे. त्यात टीबी हॉस्पिटलच्या जागेला प्राधान्य दिले जात आहे. त्या दृष्टीने प्लॅन बनविला जाणार असल्याचे महिवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महिवाल म्हणाले, अतिक्रमण हटाओ मोहीम ही केवळ यवतमाळपुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांना या संबंधीचे आदेश दिले आहेत. प्रत्येक आठवड्याला या मोहिमेचा सर्व नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. यवतमाळात हटविलेले अतिक्रमण पुन्हा होऊ नये म्हणून संयुक्त भरारी पथक राहणार आहे. अतिक्रमण हटविलेल्या जागेचा विस्तार व सौंदर्यीकरणासाठी वापर केला जाणार आहे. यवतमाळ शहराच्या विकासाच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या यवतमाळ शहरातील दुसऱ्या टप्प्याचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील नगरपरिषदांना या मोहिमेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाणार आहे. (शहर वार्ताहर)