पिस्तूल रोखणारा ‘आरटीओ’ एजंट

By Admin | Updated: October 17, 2016 01:39 IST2016-10-17T01:39:11+5:302016-10-17T01:39:11+5:30

येथील शासकीय रुग्णालय परिसरातील वाईनबारमध्ये क्षुल्लक कारणावरून युवकावर पिस्तुल रोखणाऱ्यांना

Pistol 'RTO Agent' Agent | पिस्तूल रोखणारा ‘आरटीओ’ एजंट

पिस्तूल रोखणारा ‘आरटीओ’ एजंट

दोघांना अटक : पसार आरोपींचा शोध सुरू
यवतमाळ : येथील शासकीय रुग्णालय परिसरातील वाईनबारमध्ये क्षुल्लक कारणावरून युवकावर पिस्तुल रोखणाऱ्यांना पोलिसांनी शनिावरी रात्री दोघांना जेरबंद केले असून त्यातील एक जण आरटीओचा एजंट असल्याचे पुढे आले आहे.
इम्तीयाज उर्फ रिंकू खान अयुब खान पठाण (३२) रा. गुलमोहर पार्क यवतमाळ आणि नासीर खान अब्बास खान (३२) रा. गढी वॉर्ड पांढरकवडा असे अटकेतील आरोपींची नावे आहे. यातील इम्तीयाज आरटीओ एजंट म्हणून काम करतो. त्यांना टोळी विरोधी पथकाने शनिवारी रात्री अटक करून त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेली कार एम एच ३१ झेड ८८८३ हा समोर तर एम एच ३१ झेड ८ इतकाच मागे क्रमांक असलेली गाडी जप्त केली. या वाहनात एक तलवार आढळून आली. यातील रमिम शेख रफीक शेख आणि अज्जू दोघे रा. मौलाना आझाद वॉर्ड पाढंरकवडा हे पसार आहेत. हे आरोपी यवतमाळात आश्रयाला असल्याची माहिती असून त्यांच्या अटकेची कारवाई केली जाणार आहे. पाढंरकवडा येथील तिन्ही आरोपी हे मालवाहू वाहन चालवितात. आरटीओ कार्यालयाच्या कामाने ते यवतमाळात आले होते. त्यानंतर दारू पिण्यासाठी वाईनबारमध्ये बसले. त्याचा शेजारी बसलेल्या पंकज कऱ्हाळे याच्याशी वाद झाला. त्यातूनच ही घटना घडली. ही कारवाई टोळी विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, बंडू मेश्राम, अमोल चौधरी, किरण पडघण, विनोद राठोड यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Pistol 'RTO Agent' Agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.