पिंपरी कलगात दारूबंदीसाठी महिलांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:37 IST2018-02-06T23:36:45+5:302018-02-06T23:37:24+5:30
नेर तालुक्यातील पिंपरी कलगा येथे अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. या विरोधात मंगळवारी स्वामिनी बचत गटासह सहा गटांच्या महिलांनी यवतमाळात धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना यावेळी निवेदन देण्यात आले.

पिंपरी कलगात दारूबंदीसाठी महिलांची धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नेर तालुक्यातील पिंपरी कलगा येथे अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. या विरोधात मंगळवारी स्वामिनी बचत गटासह सहा गटांच्या महिलांनी यवतमाळात धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना यावेळी निवेदन देण्यात आले.
पिंपरी कलगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू आणि हातभट्टीची दारू विकली जात आहे. पिंपरीसह परिसरातील इतरही गावांमध्ये ही समस्या फोफावली आहे. त्यामुळे महिला, शाळकरी मुलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक वाद वाढले आहेत. गावातील सलोख्याचे वातावरण दूषित होत आहे. गावात शांतता राहावी यासाठी पिंपरी कलगाव येथे दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देतेवेळी भाजपाचे जिल्हा सचिव दिलीप मादेशवार, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू श्रीराव, दिवाकर ढोके, तालुका सरचिटणीस सतीश अंबलकर, वटफळी सर्कल प्रमुख ऋषिकेश भोयर, उषाताई खरे, विणाताई खोडवे, नलिनी शेंडे, द्वारकाबाई तिरमारे, आशा खेडे, उषा भोयर, वर्षा लिजारे, रेखा भोयर, सुनिता लांभाडे, विमल लांभाडे, चंद्रकला राऊत, अनिता खेडे, वेणूबाई घड्डोनकार, सुनिता तुपटकर, रंजनाबाई भोयर, कोकीळा गोमासे, वनिता गोमासे, लता मेश्राम, वैशाली तुपटकर आदी महिला उपस्थित होत्या.