पिंपळखुटी रॅक पॉईंटचे लोकार्पण

By Admin | Updated: May 29, 2015 00:14 IST2015-05-29T00:14:15+5:302015-05-29T00:14:15+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक आणि स्वस्त दरात रासायनीक खते उपलब्ध होण्यासाठी कायर आणि पिंपळखूटी या रॅक पॉईंटची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती.

Pimple rack point extract | पिंपळखुटी रॅक पॉईंटचे लोकार्पण

पिंपळखुटी रॅक पॉईंटचे लोकार्पण

यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक आणि स्वस्त दरात रासायनीक खते उपलब्ध होण्यासाठी कायर आणि पिंपळखूटी या रॅक पॉईंटची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यापैकी पिंपळखूटी रॅक पॉईंटचे बुधवारी केंद्रीय रसायने व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रॅक पॉईटमुळे शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध होईल असे, ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार राजु तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पांढरकवडा पंचायत समिती सभापती मल्लारेड्डी पाणजवार, पिंपळखुटीचे सरपंच स्वामी कोरेड्डीवार, उपसरपंच लक्ष्मण्णा कोरेड्डीवार उपस्थित होते.
पिंपळखुटीच्या रॅक पॉईंटवर राष्ट्रीय केमीकल अ‍ॅन्ड फर्टीलायझर कंपनीचे खत घेऊन आलेली पहिली खताची मालवाहू रेल्वे (रॅक) दाखल झाली. रॅक दाखल झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याहस्ते फित कापून शुभारंभ तसेच पुजन करण्यात आले. तसेच रॅकमधून भरण्यात आलेल्या पहिल्या ट्रकला झेंडी दाखवून तो रवाना करण्यात आला.
जिल्ह्यात यापूर्वी धामणगाव किंवा अन्य ठिकाणाहून खते आणावे लागत असल्याने त्याची किंमत वाढत होती. शिवाय वेळेवर आणि मुबलक खत शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकत नव्हते. पिंपळखुटी पॉईंटमुळे आता अडचण जाणार नसल्याचे ना.अहीर म्हणाले. इफको, नागार्जून यासह अन्य नामांकीत कंपन्यांची खतेही या रॅकपॉईंटवर लवकरच उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे. खतांसोबतच सिंचन, वीज, शेतमालास योग्य भाव, एकापेक्षा जास्त पिके घेण्याची सुविधा तसेच कापसावर आधारीत प्रक्र्रिया उद्योग उभारणीवर भर आहे. देशाच्या विकासात मोलाचा हातभार असलेल्या शेतकऱ्यास चांगल्या दर्जाचे बियाणे, किटकनाशके उपलब्ध करूण देण्यात येत असल्याचेही ना. अहीर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Pimple rack point extract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.