शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

फुले-आंबेडकरी आंदोलन मानवतेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:57 IST

भारतातील सहा लाख गावातून वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने फुले-आंबेडकरी आंदोलन चालविले जाते. गत १५० वर्षात या गावांमधून साधारणत: १०० महापुरुष निर्माण झाले. भारतातील सर्व आंदोलने यात समाविष्ट होतात.

ठळक मुद्देसत्नाम सिंग : यवतमाळच्या समता पर्व - २०१८ मध्ये मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतातील सहा लाख गावातून वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने फुले-आंबेडकरी आंदोलन चालविले जाते. गत १५० वर्षात या गावांमधून साधारणत: १०० महापुरुष निर्माण झाले. भारतातील सर्व आंदोलने यात समाविष्ट होतात. दलित, आदिवासी, मुस्लीम, अन्यायग्रस्त लोकांचे जनाधार असलेले हे आंदोलन सर्वात विशाल आणि सक्रिय आंदोलन आहे. जाती, धर्म, वर्ग, संप्रदाय विरहित हे मानवतेचे आंदोलन होय, असे प्रतिपादन दिल्ली येथील विचारवंत सत्नाम सिंह यांनी केले.येथील समता मैदानावर (पोस्टल मैदान) आयोजित समता पर्व - २०१८ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘फुले-आंबेडकरी समाज आंदोलन का स्वरूप और समाज की भागीदारी का प्रश्न’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप घावडे होते. उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे यांच्या हस्ते करण्यात आले. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, इतरांकडून सेवा करून घेण्याचा ईश्वरदत्त अधिकार आहे, माणसांना माणुसकीची वागणूक न देता अतिशय हिन-दिन पद्धतीने अपमानित जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू झाले आहे, असे ते म्हणाले.जाती, धर्म, रंग, लिंग आणि जन्मस्थान यावरून माणसामाणसात भेदभाव निर्माण करणाºया विचारसरनीला विरोध करणे मानवतावादी दृष्टीकोणातून सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी यवतमाळ आयडॉलची प्रथम फेरी करण्यात आली. या स्पर्धेचे संचालन प्रवीण पाईकराव व स्नेहल नगराळे यांनी केले. उषा मोर आणि रुद्रकुमार रामटेके परीक्षक होते. यावेळी सिद्धार्थ भवरे, सोमेश्वर कुंभारे, गणेश राठोड, अनिल आडे, अशोक वानखडे, अनिल खंदारे, घनश्याम भारशंकर, रामदास चंदनकर, वसंत नारनवरे, पंकज होडकर उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. अरुण मोहोड यांनी, संचालन प्रा.डॉ. चंद्रकांत सरदार यांनी तर आभार विजय मालखेडे यांनी मानले. 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती