पुन्हा दरवाढ! यवतमाळ येथे पेट्रोलचा भाव ९२.४२ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 13:21 IST2021-01-13T13:20:00+5:302021-01-13T13:21:12+5:30
Petrol price गेले काही दिवस पेट्रोलचे आणि डिझेलचे स्थिर होते. काल मध्यरात्री पेट्रोलच्या भावात २४ पैशानी तर डिझेलच्या भावात २६ पैशानी वाढ झाली आहे .

पुन्हा दरवाढ! यवतमाळ येथे पेट्रोलचा भाव ९२.४२ रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेले काही दिवस पेट्रोलचे आणि डिझेलचे स्थिर होते .पण काल मध्यरात्री पेट्रोलच्या भावात २४ पैशानी तर डिझेलच्या भावात २६ पैशानी वाढ झाली आहे . यामुळे सर्वसामान्यांचं मात्र कंबरडं मोडले आहे. यवतमाळ येथे पेट्रोलचा दर हा ९२.४२ रुपये तर डिझेलचा दर हा ८१.४४ इतका आहे.
पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास सर्वसामान्यांना जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे.