कीटकनाशकांचा ‘साईड ईफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:02 IST2017-08-31T22:02:02+5:302017-08-31T22:02:20+5:30

गावपातळीवर सध्या विविध आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या आढळून येत आहे.

Pesticide's 'Side Effect' | कीटकनाशकांचा ‘साईड ईफेक्ट’

कीटकनाशकांचा ‘साईड ईफेक्ट’

ठळक मुद्देअनेक शेतकरी रुग्णालयात दाखल : कृषी विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन

गजानन अक्कलवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : गावपातळीवर सध्या विविध आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक रुग्णसंख्याही शेतात कीटकनाशकाच्या फवारणी दरम्यान त्वचारोगाने बाधील झालेल्यांची आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कळंब तालुक्यातील पार्डी (सावळापूर), दोनाडा, बोरीमहल आदी गावातील शेतकºयांना या रोगाचा सामना करावा लागत आहे. येथीलच ईश्वर पुरुषोत्तम पिसे, मारोती नामदेव वसू व चरणदास पुरुषोत्तम पिसे यांच्या त्वचेवर कीटकनाशक फवारणीचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर यवतमाळ व सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुुरू आहे.
शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी दरम्यान नाक, तोंड व त्वचेच्या माध्यमातून विषबाधा होण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. फवारणी करणारे शेतकरी व मजूरवर्ग या आजाराला बळी पडत आहे. दरदिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णालयेसुद्धा हाऊस फुल झाले आहेत. या प्रकारामुळे शेतीत घाम गाळणाºया शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कीटकनाशकांची फरवाणी शेतकरी वर्ग दरवर्षीच करतो. कीटकनाशकामुळे साईड इफेक्ट होणारी एखाद दुसरी घटना घडायची. परंतु यावर्षी अशा घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहे. हा सर्व प्रकार वातावरणातील बदलामुळे की किटकनाशकातील रासायनिकतेचा परिणाम आहे, हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे.
फवारणीदरम्यान मास्क वापरणे गरजेचे
फवारणी करताना सुरक्षेबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. वाºयाच्या दिशेने फवारणी करावी. त्यामुळे औषधी अंगावर उडणार नाही. नाका-तोंडावर मास्क वापरावा. हात व अंग स्वच्छ धुवावे. पावसाने उसंत घेतल्याने बहुतेक शेतकरी फवारणीकडे वळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे कदाचीत त्वचा रोगाचे प्रमाण वाढले असू शकते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार यांनी दिली.

मागील आठवड्यापासून किटकनाशक फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे. रोज दोन ते तीन रूग्ण रुग्णालयात दाखल होत आहे.
- डॉ.रवी पाटील, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, कळंब

Web Title: Pesticide's 'Side Effect'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.