मांडवा येथील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे द्या

By Admin | Updated: March 5, 2017 00:39 IST2017-03-05T00:39:37+5:302017-03-05T00:39:37+5:30

गत ५० वर्षांपासून मांडवा येथे ४० कुटूंब सरकारी जागेवर वास्तव्य करीत आहे. ते रहिवासी जागेचा रितसर करही मांडवा

Permanent lease for encroachment holders in Mandawa | मांडवा येथील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे द्या

मांडवा येथील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे द्या

ग्रा.पं. प्रशासनाला निवेदन : ४० कुटुंब भूखंडच्या प्रतीक्षेत
वर्धा : गत ५० वर्षांपासून मांडवा येथे ४० कुटूंब सरकारी जागेवर वास्तव्य करीत आहे. ते रहिवासी जागेचा रितसर करही मांडवा ग्रा.पं.ला अदा करीत आहेत. यामुळे त्या कुटुंबांना शासनाने कायमस्वरूपी घरपट्टे द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत युवा परिवर्तन की आवाज संघटनेद्वारे मांडवा ग्रा.पं. प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
मांडवा येथील रहिवासी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नाही. यामुळे ते भूखंड खरेदी करू शकत नाहीत. यापूर्वी मांडवा ग्रा.पं. द्वारे पट्टे देण्याबाबत चार वेळा ठराव मंजूर करण्यात आले. शिवाय तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत निवेदन देण्यात आले. लोकप्रतिनिधींनाही पट्टे मिळवून देण्याची विनंती करण्यात आली; पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले. मांडवा येथील नागरिकांनी युवा संघटनेमार्फत पुन्हा निवेदन देत प्रशासनाला स्मरण करून दिले आहे. मांडवा येथील ४० कुटुंबियांना कायम पट्टे द्यावे, अन्यथा संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आला. यावेळी सुरेश व नरेश तामगाडगे, हरिभाऊ मडके, मारोती डोंगरे, इश्वर बेले, रमेश मेंढे, संघटनेचे पलाश उमाटे, गौरव वानखेडे, शेख अरहान आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Permanent lease for encroachment holders in Mandawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.