भाजपच्या जिल्हा बैठकीकडे लोकप्रतिनिधींची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 09:59 PM2019-07-25T21:59:11+5:302019-07-25T21:59:46+5:30

विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहे. भाजपच्यावतीने यवतमाळात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी समर्थ लॉनमध्ये झालेल्या बैठकीला सर्व आघाड्या व पक्षाच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींंना आमंत्रित केले होते.

People's Delegation Back to BJP's District Meeting | भाजपच्या जिल्हा बैठकीकडे लोकप्रतिनिधींची पाठ

भाजपच्या जिल्हा बैठकीकडे लोकप्रतिनिधींची पाठ

Next
ठळक मुद्देविविध अभियानांची माहिती : निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष तयारीचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहे. भाजपच्यावतीने यवतमाळात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी समर्थ लॉनमध्ये झालेल्या बैठकीला सर्व आघाड्या व पक्षाच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींंना आमंत्रित केले होते. मात्र बैठकीला बोटावर मोजण्याइतकेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ का फिरविली याचीच चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये ऐकायला मिळते.
माजी संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पालकमंत्री मदन येरावार, आमदार निलय नाईक, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, वणी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदी उपस्थित होते. पक्षाचे सहाही आमदार बैठकीला आले होते. मात्र त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांची उपस्थिती अत्यंत कमी होती. यवतमाळात पक्षाचे २९ नगरसेवक आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषदेतही १८ सदस्य आहे. याशिवाय पंचायत समिती, नगरपंचायती व इतर नगरपरिषदेत सदस्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यानंतरही या बैठकीला बोटावर मोजण्या इतकेच सदस्य उपस्थित होते. संघटनेसाठी झटणाºया पदाधिकाºयांची संख्या लक्षणीय होती. मात्र त्यांच्या भरवश्यावर लोकप्रतिनिधी बनलेल्यांनी बैठकीला पाठ का दाखविली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन
जिल्हा बैठकीत सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्ह्याचे सरचिटणीस, सर्व जिल्हा आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी बुथ प्रमुखाच्या माध्यमातून पक्षाची आॅनलाईन सदस्य नोंदणी, शक्ती सन्मान महोत्सव, रक्षासूत्र अभियान राबविण्याचे निर्देश दिले. बुथ प्रमुखांनी विविध सामाजिक संघटना, क्रीडा क्षेत्र, नवोदित मतदार यांच्यापर्यंत प्रकर्षाने पोहोचावे असेही सांगण्यात आले. पक्षाचा विचार, सरकारने आखलेल्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश देण्यात आले. याच वेळी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल ना. अशोक उईके व आदिवासी विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उत्तमराव इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक, संचालन व आभार जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनीच केले.

Web Title: People's Delegation Back to BJP's District Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा