न विचारता गावात शिरल्यास अडीच हजारांचा दंड; गावकऱ्यांनी केली स्वयंस्फूर्तीने गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:44 PM2020-03-25T12:44:40+5:302020-03-25T12:45:31+5:30

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीला साथ देत विदर्भातील गावकऱ्यांनी गावबंदीचा आदेश काढून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत.

Penalty of two and a half thousand if he goes into town without asking; Spontaneous blockade by villagers | न विचारता गावात शिरल्यास अडीच हजारांचा दंड; गावकऱ्यांनी केली स्वयंस्फूर्तीने गावबंदी

न विचारता गावात शिरल्यास अडीच हजारांचा दंड; गावकऱ्यांनी केली स्वयंस्फूर्तीने गावबंदी

Next
ठळक मुद्देगोंदिया, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यात गावबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीला साथ देत विदर्भातील गावकऱ्यांनी गावबंदीचा आदेश काढून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालूक्यातील चिचगाव गावात गावबंदी करण्यात आली आहे . गावात कुणी बाहेरून न विचारता आला तर अडीच हजार रुपये फाईन ठोकण्याचा नियम बनविण्यात आला आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर निघताना गावकºयांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातील राणीधानोरा गावानेही गावाबाहेरच्या रस्त्यावर आडवे बांबू लावून रस्ता रोखला आहे. तर भंडारा जिल्ह्यात पवनारा येथे गावात शिरणाºया रस्त्यावर काटे लावून तो रोखून धरला आहे.

Web Title: Penalty of two and a half thousand if he goes into town without asking; Spontaneous blockade by villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.