बाल वैज्ञानिकांची मांदियाळी
By Admin | Updated: October 9, 2016 00:12 IST2016-10-09T00:12:20+5:302016-10-09T00:12:20+5:30
जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातील बाल वैज्ञानिकांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.

बाल वैज्ञानिकांची मांदियाळी
इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन : रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत आयोजन
यवतमाळ : जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातील बाल वैज्ञानिकांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. जिल्ह्याच्या विविध शाळांमधील १२५ हून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा यासाठी येथील रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रविवार, ९ आॅक्टोबर रोजी या प्रदर्शनाचा समारोप होत आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार पुरस्कृत माध्यमिक, प्राथमिक व निरंतर शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षक अंकुश कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविकातून माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा उद्देश सांगितला. उपस्थित मान्यवरांसह निरंतर शिक्षणाधिकारी ए.एस. पेंदोर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी देवीदास डंभे, शिक्षण निरीक्षक चंद्रप्रकाश वाहाने, विज्ञान निरीक्षक नीता गावंडे, प्रसिद्धी विभाग प्रमुख भुमन्ना बोमकंटीवार आदींची उपस्थिती होती. संचालन जयश्री देशमुख, वीणा भगत यांनी, तर आभार उपशिक्षणाधिकारी अशोक रोहणे यांनी मानले. यावेळी जिल्ह्याच्या विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)