मॅरेथॉनमधून शांतता व शिक्षणाचा संदेश

By Admin | Updated: January 16, 2017 01:03 IST2017-01-16T01:03:48+5:302017-01-16T01:03:48+5:30

गो.सी. गावंडे महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या मॅरॉथॉन स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Peace and education message from the marathon | मॅरेथॉनमधून शांतता व शिक्षणाचा संदेश

मॅरेथॉनमधून शांतता व शिक्षणाचा संदेश

उमरखेड येथे स्पर्धा : वाशीमच्या प्रथम तर रिसोडच्या स्पर्धकाला व्दितीय क्रमांक
उमरखेड : गो.सी. गावंडे महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या मॅरॉथॉन स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहा किलोमीटरच्या या स्पर्धेला सुशीला गावंडे व अ‍ॅड़ मीता गावंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यावेळी नगराध्यक्ष नामदेव ससाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, माजी आमदार विजय खडसे, नारायण भट्टड, राम देवसरकर, अ‍ॅड़ संतोष जैन, अ‍ॅड़ बाळासाहेब नाईक, सुभाष दिवेकर, आदेश जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या तीन वर्षांपासून गो.सी. गावंडे महाविद्यालयाकडून शांतता व शिक्षणाच्या प्रचार, प्रसारासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी राज्यातून ११६० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये पुरूष व महिला असे दोन गट होते. पुरूष गटामध्ये वाशिम येथील संदीप तायडे यांनी प्रथम तर रिसोड येथील जयेश चौधरी आणि गजानन गुगले (वाशीम) यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. महिला गटामध्ये कांचन मात्रे हिने प्रथम, निकीता मात्रे हिने व्दितीय तर स्रेहा बोरकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसह अखिल भारतीय कुणबी समाज संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शहरातील विविध संघटनांनी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Peace and education message from the marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.