महावितरणच्या विविध आकाराने देयके फुगली
By Admin | Updated: November 8, 2014 22:45 IST2014-11-08T22:45:40+5:302014-11-08T22:45:40+5:30
वीज ग्राहकांना दर महिन्यात देण्यात येणारी देयके वीज आकारासोबत लावल्या जाणाऱ्या ईतर आकाराने फूगून महागडी ठरत आहे़ वीज देयक हाती पडताच ग्राहकांना धक्का बसत आहे. मात्र वीज ही

महावितरणच्या विविध आकाराने देयके फुगली
वणी : वीज ग्राहकांना दर महिन्यात देण्यात येणारी देयके वीज आकारासोबत लावल्या जाणाऱ्या ईतर आकाराने फूगून महागडी ठरत आहे़ वीज देयक हाती पडताच ग्राहकांना धक्का बसत आहे. मात्र वीज ही आवश्यक गरज असल्याने ग्राहकांना देण्यात आलेले देयक भरणे भाग पडत आहे.
विजेचे घरगुती, व्यावसायीक, औद्योगीक, कृषी व सार्वजनिक सेवेकरिता वापरल्या जाणाऱ्या युनिटचे दर विद्युत नियामक आयोगाने निर्धारित करून दिले आहे़ हे दर वीज देयकाच्या मागे छापलेले असते. मात्र ग्राहकांना येणारे प्रत्यक्ष देयक व वीज दर याचा कुठेच ताळमेळ जुळताना दिसून येत नाही. कारण वीज दरासोबतच वीज वितरण कंपनी स्थिर आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार व अतिरिक्त आकार, असे चार प्रकारचे आकार अधिकचे लादत आहे.
वीज ग्राहक संघटनेने एखादेवेळी उठाव केल्यास यापैकी काही आकार तात्पुरते रद्द केले जातात़ मात्र काही दिवसांनीच पुन्हा त्यांचा वीज देयकात समावेश केला जातो़ ही चाल वीज वितरण कंपनी नियमितपणे आणि पद्धतशीरपणे खेळत आहे़
देयकाविषयी तक्रार घेऊन गेल्यास महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांचे समाधान करीत नाही़ आधी देयक भरा, मगच तक्रारीचा विचार करू, असे ग्राहकांना बजावले जाते. एक महिना वीज देयक न भरल्यास विजेची जोडणी मात्र तातडीने कापली जाते. त्यामुळे ग्राहकांना आलेले वीज देयक भरण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो़ (स्थानिक प्रतिनिधी)