पोफाळी ठाणेदाराची उचलबांगडी
By Admin | Updated: June 30, 2016 02:31 IST2016-06-30T02:31:55+5:302016-06-30T02:31:55+5:30
पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांची तडकाफडकी बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले ..

पोफाळी ठाणेदाराची उचलबांगडी
बाहेकर रुजू : अवैध व्यवसाय प्रकरण भोवले
उमरखेड : पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांची तडकाफडकी बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले तर पोफाळीच्या ठाणेदारपदी मिलिंद बाहेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मटका किंगने तालुक्यातील अवैध धंद्याचा पत्रपरिषदेत केलेला भंडाफोड ठाणेदाराच्या अंगलट आला.
उमरखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून त्याला राजकीय पाठबळ असल्याचा भंडाफोड मटका किंग दारासिंग रुडे यांनी गत आठवड्यात पत्रकार परिषदेत केला होता. तसेच पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या मोबाईल संवादाची ध्वनिफितही पत्रकारांना ऐकून दाखविली होती. त्यामुळे राजकीय आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. या प्रकरणी गंभीर दखल घेत आमदार राजेंद्र नजरधने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यावरून पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षात बसविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)