पुसदच्या हॉस्पिटलला रुग्णाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:32 IST2021-04-29T04:32:27+5:302021-04-29T04:32:27+5:30
शेख बिलाल शेख मदार हे १८ मार्च रोजी छातीचा सीटीस्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलला गेले होते. त्यांच्याकडून ४ हजार २०० रुपये ...

पुसदच्या हॉस्पिटलला रुग्णाची नोटीस
शेख बिलाल शेख मदार हे १८ मार्च रोजी छातीचा सीटीस्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलला गेले होते. त्यांच्याकडून ४ हजार २०० रुपये शुल्क घेण्यात आले. त्यांनी बेड उपलब्ध असतानाही शासन दरापेक्षा जास्त पैसे का घेतले, याची विचारणा केली म्हणून हॉस्पिटलने रुग्णसेवा व उपचार केले नाही, असा गंभीर आरोप केला आहे.
कोविडग्रस्त रुग्णाला हाॅस्पिटलमधून उपचाराबाबत नकार मिळताच त्यांनी दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांनी वकील ॲड. विवेक देशमुख यांच्यामार्फत हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश चिद्दरवार यांना नोटीस पाठवून सीटी स्कॅनचे अतिरिक्त घेतलेल्या पैशाबाबत विचारणा केली आहे. समाधान न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.
याबाबत मेडिकेअर हाॅस्पिटलचे संचालक डॉ. सतीश चिद्दरवार यांच्याशी संर्पक साधला असता तो होऊ शकला नाही.