रस्ता रूंदीकरणात प्रवाशांचा जीव सापडला धोक्यात

By Admin | Updated: September 30, 2014 23:42 IST2014-09-30T23:42:35+5:302014-09-30T23:42:35+5:30

वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़

Passage of the passage of the passenger's life in danger | रस्ता रूंदीकरणात प्रवाशांचा जीव सापडला धोक्यात

रस्ता रूंदीकरणात प्रवाशांचा जीव सापडला धोक्यात

बोटोणी : वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़
गेल्या दोन-तीन वर्षांपासून वणी ते करंजी या राज्य मार्गाचे कासवगतीने रूंदीकरण सुरू आहे़ रस्ते हे देश विकासाच्या रक्तवाहिन्या समजल्या जाते़ परंतु या रस्ता रूंदीकरणात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहने खिळखिळी होत आहे. दररोज या रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या कंबरा खिळखिळ्या झाल्या़ परिणामी वाहनासह प्रवाशांचे आयुष्य कमी होत आहे़
वणी ते करंजी मार्गावरील खडकी नाल्यालगत रस्त्याचे रूंदीकरण होत आहे़ तेथे एकेरी वाहतूक सुरू असून रात्री फलकाअभावी वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण जाते़ करंजीकडून येणारे वाहन जर वेगात असेल, आणि या ठिकाणी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास किंवा बे्रेक न लागल्यास वाहन खडकीच्या नाल्यात गेल्याशिवाय राहात नाही़
हीच परिस्थिती बोटोणीनजीकच्या पुलाची आहे. रस्ता रूंदीकरणानाने येथेही एकेरी वाहतूक आहे़ अर्धाअधिक रस्ता खोदल्यामुळे वाहन रस्त्याच्या खालून चालवावे लागते़ पाऊस पडल्यास तेथे चिखल साचत असल्याने वाहन पलटले जाते़ वाहनावरचे नियंत्रण सुटल्यास वाहन पुलामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या मार्गावर अनेक ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे़ त्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी गिट्टी, मुरूम टाकल्याने आता खड्डे पडले आहेत़
पुलाचे बांधकाम रस्ता रूंदीकरणासाठी अडसर ठरत आहे़ त्यातच महावितरण कंपनीने भूमिगत वीज वाहिनीसाठी अनेक ठिकाणी आरपार रस्ते खोदले आहेत. गिट्टी, मुरूम टाकून तात्पुरती खड्ड्याची मलमपट्टी केली़ आता मात्र अनेक ठिकाणी नालीसारखे खड्डे पडत आहे़ वणी ते करंजी या ५० किलोमीटर रस्त्याचे रूंदीकरण आंध्रप्रदेशातील एका कंपनीला देण्यात आले. मात्र या कामात गैरप्रकार होत असल्याची ओरड सुरू आहे.
सोमनााळा बसस्थानकानजीक डांबरीकरण उखडल्याने खड्डा पडला आहे़ मांगरूळ येथील हनुमान मंदिरानजीकच्या पुलाचे डांबरीकरण दबले आहे़ तेथे वाहन उसळते़ मांगरूळ-वेगाव चौफुली रस्त्यावर पुलाचे डांबरीकरण दबले आहे़ यात भ्रष्टाचार होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे़ रस्त्याच्या रूंदीकरणासाठी खोल खोदकाम करण्यात आले. मात्र काम सुरू असल्याचे फलकच गायब झाले आहे़ त्यामुळे रात्री वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते़ याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे़ (वार्ताहर)

Web Title: Passage of the passage of the passenger's life in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.