साहेबांच्या बंगल्यापुढे पार्किंग

By Admin | Updated: July 23, 2015 02:27 IST2015-07-23T02:27:04+5:302015-07-23T02:27:04+5:30

तहसीलदारांच्या येथील शासकीय निवासस्थानासमोरच बिनदिक्कतपणे चार चाकी अनेक वाहने उभी दिसतात.

Parking before the boss's bungalow | साहेबांच्या बंगल्यापुढे पार्किंग

साहेबांच्या बंगल्यापुढे पार्किंग

तालुका दंडाधिकारी : थातूरमातूर कारवाईचा देखावा
वणी : तहसीलदारांच्या येथील शासकीय निवासस्थानासमोरच बिनदिक्कतपणे चार चाकी अनेक वाहने उभी दिसतात. मात्र त्याविरूद्ध थातूरमातूर कारवाई करून कारवाईचा केवळ देखावा निर्माण केला जातो.
शहरातील तहसील चौक परिसरात तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान आहे. त्यात तहसीलदार वास्तव्य करतात. याच निवासस्थानासमोर बाहेरगावावरून येणारे चार चाकी वाहन किंवा इतर मालवाहू वाहन उभे केले जातात. अनेकदा तर दिवसभर अशी वाहने तेथे बिनदिक्कतपणे उभे दिसतात. अनेक दुचाकीही तेते उभ्या असतात. चक्क तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानासमोरच वाहन चालक पार्किंग करीत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून वाहन चालक तेथेच वाहनांची पार्किंग करीत आहे.
हा प्रकार तहसीलदारांना नेहमी दृष्टीस पडतो. अनेकदा तर तहसीलदार पायदळच कार्यालयात पोहोचतात. निवासस्थान आणि कार्यालय अत्यंत नजिक असल्याने ते पायदळ जाणे पसंत करतात. त्यावेळी त्यांनाही तेथे पार्किंग केलेल्या वाहनांपासून बचाव करीत कार्यालयात पोहोचावे लागते. मात्र तरीही वाहन चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत नाही. परिणामी वाहन चालकांची मुजोरी चांगलीच वाढत आहे. शासकीय निवासस्थानासमोर आता उभ्या राहणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शहरात दररोज बाहेरगावावरून मालवाहू ट्रक मोठ्या प्रमाणात येतात. त्यापैकी काही वाहने तहसील कार्यालयाकडून तहसीलदारांच्या निवासस्थानासमोर वरोराकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूने उभे राहतात. त्यामुळे अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या मार्गाने लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थीसुद्धा महाविद्यालयात जातात. त्यांनाही या वाहनांचा त्रास सहन करावा लागतो.
या निवासस्थानासमोरच धान्याचे शासकीय गोदाम आहे. या गोदामाला वृक्षांनी वेढा दिला आहे. गोदाम परिसरात खुली जागा असल्याने अनेक वाहने त्या जागेवरही ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता त्वरेने कारवाई करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा वाहन चालक मुजोर होतील. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Parking before the boss's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.