विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पालकांनी सूचविल्या उपाययोजना

By Admin | Updated: July 2, 2016 02:34 IST2016-07-02T02:34:59+5:302016-07-02T02:34:59+5:30

यवतमाळ पब्लिक स्कूलमधील (वायपीएस) छेडखानीच्या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐेरणीवर आला ...

Parents suggested measures for the safety of the students | विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पालकांनी सूचविल्या उपाययोजना

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पालकांनी सूचविल्या उपाययोजना

‘त्या’ घटनेनंतरची सावधगिरी : ‘वायपीएस’मधील प्रकरण
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमधील (वायपीएस) छेडखानीच्या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐेरणीवर आला असून त्या दृष्टीने नागरिकांनी अनेक उपाययोजना सूचविल्या आहेत.
यवतमाळ पब्लिक स्कूलमधील यश निलमचंद बोरूंदिया व अमोल अरुण क्षीरसागर या दोन शिक्षकांवर विद्यार्थिनींच्या छेडखानीचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने या दोनही शिक्षकांना तातडीने वडगाव रोड पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांना शाळेतून बडतर्फ केले. या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राधिका ले-आऊटमधील गणपती मंदिरात शेकडो नागरिक व पालक एकत्र आले. त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. दिवसभरातील चर्चेतून अनेक सूचना पुढे आल्या. या सूचनांचे एक निवेदन शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे ठरले आहे. दुपारी काही महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केल्याचे सांगितले जाते. सायंकाळी महिला व बाल कल्याण समितीद्वारे तक्रारकर्त्या पालकांची बयाने नोंदविली गेली. यावेळी तेथे नागरिकांनी गर्दी केली होती. वडगाव रोड पोलिसांनी गुरुवारी व आज शुक्रवारीसुद्धा यवतमाळ पब्लिक स्कूलचे प्राचार्य जेकब दास यांना पाचारण करून त्यांची चौकशी केली. पोलिसांनी त्या दोन शिक्षकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आता भादंविच्या कलम ३७६ (ख) या कलमाची भर घातली आहे. शुक्रवारी दुपारी यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी यवतमाळ पब्लिक स्कूलला भेट दिली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते यांनी शाळेत भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला होता.

अशा आहेत नागरिकांच्या शाळेसाठी सूचना
मुलींच्या गणवेशात बदल करण्यात यावे (मुलींना जे सुविधाजनक असेल असा गणवेश त्यांना घालण्यासाठी द्यावा), गणवेश निवडीची प्रक्रिया काही पालक वर्गांना सोबत घेऊन चर्चा करावी.
सीसीटीव्हीवरून येणाऱ्या डिस्प्ले सर्वांना पाहता येईल यासाठी शाळेबाहेर एका ठिकाणी व्यवस्था करावी.
नृत्य, कला, खेळ आणि संगीत या गतिविधींकरिता मुलींसाठी वेगळ्या महिला शिक्षक नेमाव्या.
प्राथमिक शाळेवर म्हणजे पाचवीपर्यंत कोणत्याही पुरुष शिक्षकाला नेमणूक देऊ नये.
प्रत्येक वर्गात मुला-मुलींसाठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात यावी.
मुला-मुलींच्या प्रसाधनगृहाबाहेर नियमित निगराणीकरिता एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी.
एकट्या मुलीला किंवा मुलाला कोणत्याही विषयावरील चर्चेसाठी शिक्षकाने एकांतामध्ये बोलावू नये.
शाळेच्या वेळेनंतर चालविले जाणारे अतिरिक्त क्लासेस तत्काळ बंद करावे.
शाळेतील गैरप्रकाराबाबत तक्रार आल्यास प्राचार्याने शांतपणे ऐकून घेऊन समाधान करावे.

Web Title: Parents suggested measures for the safety of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.