१७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का, पालक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:47 IST2021-08-12T04:47:22+5:302021-08-12T04:47:22+5:30
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाने २६ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. ...

१७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का, पालक संभ्रमात
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाने २६ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. शाळा सुरू झाल्यानंतर पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले, परंतु विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे प्रमाण केवळ २५ ते ३० टक्के आहे. ऑनलाइन अध्यापनात वेळेची मर्यादा असल्याने मुलांच्या आकलनाचा प्रश्न उद्भवतो, तरी कोरोना संकटकाळात मुलांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. गावात रुग्ण नसला, तरी शिक्षक, तसेच काही विद्यार्थी बाहेरगावातून येणारे आहेत. त्यामुळे संक्रमणाचा धोका टळलेला नसल्याने पुननिर्णय व्हावा. महाविद्यालयीन मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर, महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे शासन सांगत आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याची घाई मात्र नाहक सुरू आहे. लसीकरणाचा पत्ता नाही, लहान मुलांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. त्यामुळे पालकांमध्ये मात्र प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.