सचिंद्र प्रताप सिंगसाठी परभणीत आंदोलन

By Admin | Updated: May 18, 2015 02:14 IST2015-05-18T02:14:48+5:302015-05-18T02:14:48+5:30

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांची यवतमाळ येथे झालेली बदली रद्द करावी यासाठी परभणीकर जनता आंदोलनाच्या तयारीत आहे.

Parbhani movement for Sachindra Pratap Singh | सचिंद्र प्रताप सिंगसाठी परभणीत आंदोलन

सचिंद्र प्रताप सिंगसाठी परभणीत आंदोलन

बंदची घोषणा : बदली रद्दची मागणी
यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांची यवतमाळ येथे झालेली बदली रद्द करावी यासाठी परभणीकर जनता आंदोलनाच्या तयारीत आहे. बदली रद्द झाली नाही तर परभणी येथे सोमवारी बंदचे आयोजन केले आहे.
राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. त्यात यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांची बदली परभणी येथे करण्यात आली तर परभणीचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांची यवतमाळात बदली करण्यात आली. अद्याप सचिंद्र प्रताप सिंग यवतमाळात रुजू झाले नाही. मात्र त्यांची झालेली बदली परभणीकरांना रुचली नाही. स्वच्छ प्रशासन, कर्तव्यदक्ष अधिकारी आणि राजकीय हस्तक्षेपाला न जुमाननारा अधिकारी अशी सिंग यांची प्रतिमा आहे. जनतेच्या मनात त्यांनी आपल्या कार्यातून विश्वास निर्माण केला. अशा या अधिकाऱ्याची बदली होत असल्याने परभणीकर संतप्त झाले. स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी रस्त्यावर येऊन परभणी बंदचे आयोजन केले आहे. शासनाच्या बदली आदेशाचा निषेध करण्यात आला. आता हा आदेश रद्द करण्यासाठी संपूर्ण शहरच बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान यवतमाळचा पदभार अद्यापही सचिंद्र प्रताप सिंग यांनी स्वीकारला नाही. यवतमाळकरांनाही या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची प्रतीक्षा असून त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे.

Web Title: Parbhani movement for Sachindra Pratap Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.