पांढरकवडा येथे परधान समाजाची रॅली

By Admin | Updated: October 28, 2015 02:38 IST2015-10-28T02:38:46+5:302015-10-28T02:38:46+5:30

राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीतील १७ जमातींच्या मानसशास्त्रीय सर्व्हेक्षणातून परधान समाजाला वगळण्यात यावे,

Paratha Samaj Rally at Pandharkawada | पांढरकवडा येथे परधान समाजाची रॅली

पांढरकवडा येथे परधान समाजाची रॅली


पांढरकवडा : राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीतील १७ जमातींच्या मानसशास्त्रीय सर्व्हेक्षणातून परधान समाजाला वगळण्यात यावे, यासाठी येथील परधान समाज कृती समितीने मित्र क्रीडा मंडळाचे पटांगण ते तहसीलपर्यंत रॅली काढली. नंतर तहसीलदारांना निवेदन सादर केले.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याच्या आदेशात परधान जमातीचा समावेश केल्यामुळे परधान समाजाने शासनाचा निषेध केला आहे. तसेच परधान ही जमात गोंडी संस्कृतीशी निगडीत असून गोंड व परधानांचे रक्ताचे संबंध आहे. याचे पुरावे हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात सापडल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्यघटनेत परधान या जमातीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करूनच समावेश करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आता परधान जमातीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरजच काय, असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
गोंड आणि परधानांचे दैवत एकच आहे. जन्म, मृत्यू, लग्न व विधी आदी संस्कृती व रितीरिवाज सारखे आहे. त्याचे पुरावे आदिवासी आयुक्तालय संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे येथे संग्रहित आहे. त्यामुळे आता होत असलेल्या सर्व्हेक्षणातून परधान जमातीला वगळावे, अशी मागणी निवेदनातून डॉ.संजय तोडासे, बबन सोयाम, वामन सिडाम, बंडू सोयाम, डॉ.प्रतिभा तोडासे, पिंकी तोडासे, रवी कनाके, संभा मडावी, दत्ता मालगडे, प्रशांत सोयाम, रामकृष्ण कनाके, प्रकाश आत्राम, किशोर कनाके, आत्माराम कनाकेसह समाज बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Paratha Samaj Rally at Pandharkawada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.