पक्षीय दावेदारीचा संभ्रम
By Admin | Updated: October 13, 2016 01:04 IST2016-10-13T00:33:16+5:302016-10-13T01:04:59+5:30
विधान परिषदेच्या यवतमाळ या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांची मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

पक्षीय दावेदारीचा संभ्रम
औरंगाबाद : उर्दू कॅलेंडरनुसार मोहर्रम महिन्याच्या १० तारखेला साजरा करण्यात येणारा ‘आशूरा’ बुधवारी श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी सिटीचौक येथे सवाऱ्यांचा ‘मजमा’ भरला होता. याचवेळी शियापंथीयांतर्फे ‘मातमी जुलूस’ काढण्यात आला होता. सवाऱ्या आणि जुलूस पाहण्यासाठी सिटीचौकात अलोट गर्दी झाली होती.
शहरात बसविण्यात आलेल्या ९३ सवाऱ्या काल रात्रीपासून सिटीचौक येथे जमत होत्या. सवाऱ्यांसोबत ‘दुल्हा-दुल्हा’ खेळणारे युवकदेखील ढोलताशाच्या गजरात सहभागी झाले होते. प्रत्येक सवारीसोबत एक ‘हाली’ होता. काही सवाऱ्यांसोबत असलेले युवक हिरव्या रंगाचे पोशाख घातलेले होते. सवाऱ्या सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर पोहोचल्यावर पुष्पहार घालून पोलिसांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येत होते. यावेळी अलम बरदार कमिटीचे अध्यक्ष तथा माजी महापौर रशीद खान मामू यांनी मान्यवरांची पांढरे फेटे बांधून स्वागत (दस्तार बंदी) केले.
शहागंजपासून जुना बाजारपर्यंत पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी कठडे उभारून नागरिकांना उभे राहण्याची व्यवस्था केली होती. मुस्लिम बांधवांनी आपले व्यवहार व दुकाने बंद ठेवून ‘आशूरा’ साजरा केला. बऱ्याच ठिकाणी सरबत वाटण्यात आले. काही ठिकाणी अन्नदानही करण्यात आले.