‘जेडीआयईटी’चे पंकज पंडित आचार्य पदवीने सन्मानित
By Admin | Updated: March 5, 2017 01:03 IST2017-03-05T01:03:59+5:302017-03-05T01:03:59+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. पंकज मनोहर पंडित

‘जेडीआयईटी’चे पंकज पंडित आचार्य पदवीने सन्मानित
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. पंकज मनोहर पंडित यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विषयात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. पंकज पंडित यांनी ‘डेव्हलपमेंट आॅफ आॅब्जेक्ट रिकग्निशन अल्गोरिदम युझींग स्केलेटन शॉक ग्राफ अँड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅप्रोचेस’ या विषयावरील संशोधन पूर्ण केले. यासाठी त्यांना चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर आकोजवार यांचे मार्गदर्शन लाभले. या विषयावर त्यांचे एक पेटेंट प्रसिद्ध झाले आहे. चार आंतरराष्ट्रीय जर्नल्स, एक आंतरराष्ट्रीय आयईई परिषदेत, तर एक राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादरीकरण/प्रसिद्ध झालेले आहे. त्यांना २० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. गेली १७ वर्षांपासून ते ‘जेडीआयईटी’तील परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहेत. ते आयईटीईचे फेलो आजीवन सदस्य, तर आयई व आयएसटीईचे आजीवन सदस्य आहेत. (वार्ताहर)