शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

उमरखेड तालुक्यात पैनगंगेचे वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 11:38 PM

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाºया पैनगंगा नदी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले असून आगामी काळातील पाणी टंचाईची चाहूल लागली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईची चाहूल : ५० गावांना बसणार फटका

ऑनलाईन लोकमत उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाºया पैनगंगा नदी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले असून आगामी काळातील पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. नदी पात्र कोरडे असल्याने तालुक्यातील ५० गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. दरवर्षी या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते.उमरखेड तालुक्याची जीवनदायी म्हणून पैनगंगेची ओळख आहे. परंतु अलिकडच्या काही वर्षात हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी पडत आहे. त्यामुळे नदी तिरावरील पन्नास गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवट, पिंपरी, नागापूर, बेलखेड, बारा, संगम चिंचोली, मार्लेगांव, निंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, कोपरा बोरी, मानकेश्वर, सावळेश्वर, सिंदगी, सोईट, ढाणकी, भोजनगर, बिटरगांव, खरबी, परोटीवन, बंदीटाकळी यासह अनेक गावात पाणी टंचाई जाणवत आहे.यावर्षी डिसेंबर महिन्यात पैनगंगा कोरडी पडली असून नदीपात्रात पाण्याचे डबके साचले आहे. काही भागात तर वाळवंट झाले आहे. याच पैनगंगेच्या पात्रातून मोटारपंपाद्वारे ओलितासाठी पाणी घेतले जाते. मात्र यंदा पैनगंगा कोरडी पडल्याने ओलित ही धोक्यात आले आहे. पूर्वी बाराही महिने पैनगंगा खळखळून वाहत असायची परंत ुआता इसापूर धरणामुळे नदी हिवाळ्यातच कोरडी पडते.पावसाळ्यात पुराचा फटका तर उन्हाळ्यात पाणी टंचाई असे समीकरण झाले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.पाण्यासाठी भटकंतीपैनगंगा नदी कोरडी पडल्याने नदी तिरावरील विदर्भातील पन्नास आणि मराठवाड्यातील तीस गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. नदी तिरावर असलेल्या नळ योजनेच्या विहीरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.