पांढरकवडाचे ठाणेदार गौतम अपघातात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:38 IST2019-02-11T21:38:26+5:302019-02-11T21:38:56+5:30
पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिलसिंह गौतम मिटनापूर नजीक अपघातात जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

पांढरकवडाचे ठाणेदार गौतम अपघातात जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिलसिंह गौतम मिटनापूर नजीक अपघातात जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
ठाणेदार अनिलसिंह दशरथसिंह गौतम (५५) आपल्या कारने (क्र.एम.एच.२७/ए.आर.६२७२) यवतमाळ येथून अमरावतीकडे जात होते. मिटनापूर (थाळेगाव) जवळ रस्त्यावरून आडव्या जाणाऱ्या वन्यप्राण्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार झाडावर आदळली. यात अनिलसिंह गौतम जखमी झाले. त्यांना स्टेअरिंगचा मार लागला. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालय व नंतर यवतमाळला हलविण्यात आले.
बाभूळगाव, नांदुरा (बु), वीरखेड, वाटखेड, फाळेगाव, थाळेगाव आदी गावांजवळ नेहमी वन्यप्राण्यांमुळे अपघात घडत आहे. ठाणेदार गौतम यांनी प्रसंगावधान राखून एअर बॅग उघडल्यामुळे सुदैवाने ते बचावले. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ते स्वत: कार चालवित होते. वाहनात ते एकटेच होते.