शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

पाच भाविकांच्या निधनाने पंचक्रोशी गहिवरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:06 IST

राळेगाव तालुक्यातील रिधोरा या छोट्याशा गावाने पाच भाविकमनाचे गावकरी अपघातात गमावले. देवदर्शनाला जाताना कुणाला काहीही कल्पना नसताना अचानक मृत्यूने गाठले. मृतकांवर शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देशोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : रिधोरा गावातील एकाही घरात चूल पेटली नाही

मंगेश चवरडोल ।लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : राळेगाव तालुक्यातील रिधोरा या छोट्याशा गावाने पाच भाविकमनाचे गावकरी अपघातात गमावले. देवदर्शनाला जाताना कुणाला काहीही कल्पना नसताना अचानक मृत्यूने गाठले. मृतकांवर शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेमुळे संपूर्ण वडकी पंचक्रोशी गहिवरली असून गावात एकाही घरात चूल पेटली नाही.वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव फाट्याजवळ शुक्रवारी हा भीषण अपघात घडला. रिधोरा गावातील काही महिला वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील आजनसराकडे निघाल्या होत्या. भोजाजी महाराज देवस्थानात दर्शन घेऊन वाढदिवस करण्यासाठी हा जत्था निघाला होता. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील कारेगाव फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या आॅटोरिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास १५ जण गंभीर जखमी झाले.मृतांपैकी येनुबाई जुमनाके यांच्या पार्थिवावर शुक्रवारीच रात्री ११ वाजता अंत्यविधी करण्यात आला. तर अरविंद बोरुले, संगीता बोरुले, उमाबाई शेंडे, जया लोनबले यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यविधी करण्यात आला. यावेळी तालुक्यातील अनेक राजकीय पुढाऱ्यांसह परिसरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती. या दुखद घटनेची वार्ता पसरताच पंचक्रोशीत शोककळा पसरली.जखमींच्या उपचारासाठी लोकवर्गणीया भीषण अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जणांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा कठीण प्रसंगी गावकरीच मदतीला धावून आले. गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.चिमुकल्यांचा आक्रोशया भीषण अपघातामुळे ललित अरविंद बोरुले आणि वेदिका अरविंद बोरुले हे बहीण-भाऊ पोरके झाले आहेत. त्यांचे आईवडील अपघातात मृत्यू पावले. अंत्यसंस्कारावेळी या चिमुकल्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू