महागाव येथे प्रहार जनशक्तीचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:29 IST2018-09-20T22:27:57+5:302018-09-20T22:29:12+5:30
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील तहसीलसमोर प्रहार जनशक्तीने साखळी उपोषण सुरू केले. चार दिवसानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

महागाव येथे प्रहार जनशक्तीचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील तहसीलसमोर प्रहार जनशक्तीने साखळी उपोषण सुरू केले. चार दिवसानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सामान्यांच्या मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाने संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू केले आहे. साखळी उपोषणाचा अल्टिमेट संपल्यानंतर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू झाले. आॅनलाइन बायोमेट्रिक प्रणालीमुळे वंचित असलेल्यांना आॅफलाईन पद्धतीने धान्य द्यावे, नवीन केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्याचा लाभ द्यावा, नगरपंचायतीमार्फत सुरू असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, कामाचे देयक अदा करू नये, पोलीस वसाहतीसाठी सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून वास्तू व वसाहत बांधकाम तत्काळ सुरू करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.
उपजिल्हा प्रमुख अमोल आवटे, पंजाबराव पाटील हिवरेकर, पवन धरणकर, सागर डोंगरे, शिखर माहुरे, विलास वळसे, सुनील आखरे, अक्षय भालेराव या आंदोलनात सहभागी आहे. मात्र अद्याप लोकप्रतिनिधी व सीओंनी उपोषणाला भेट दिली नाही.