तालुक्याच्या राजुरा शिवारातील श्रीराम ठाकरे यांच्या शेतातील साडेतीन एकर केळी जळून खाक झाली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता घडली. ड्रीप पाईपसह संपूर्ण केळी खाक झाल्याने शेतकऱ्याचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. ...
यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी कर्ज वाटपाची तयारी सुरू केली. यावर्षी जिल्ह्यातील बँकांना तब्बल दोन हजार १४२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ७० टक्के कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत बँकांना करावे लागणार आहे. ...
येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर हे सांगितलेल्या कामांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने काही नगरसेवकांमध्ये कमालिचा रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे बोरकर यांच्या बदलीसाठी नाराज नगरसेवकांचा एक गट एकवटला आहे. ...
तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन देऊन नाबार्डने तूर व चणा खरेदी करावा, अशी मागणी केली आहे. नाबार्डतर्फे यापूर्वी खरेदी सुरू करण्यात आली होती. परंतु शासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे खरेदी थांबली. ...
तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती ...
शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सावळेश्वर गाव प्रचंड अस्वस्थ आहे. प्रशासन मात्र ही शेतकरी आत्महत्या नसून अपघातच आहे, हे दाखविण्यासाठी मरणदारी तळ ठोकून बसले आहे. ...
धामणगाव मार्गाच्या रुंदीकरणात तोडलेल्या झाडांपैकी १७ झाडांचे जांब फॉरेस्ट पार्कमध्ये पुनर्रोपण करण्यात आले होते. त्यापैकी एका कडूनिंबाच्या वृक्षाला आता पालवी फुटली आहे. ...
जम्मू काश्मिरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि सुरत येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वात सर्वधर्मीय समाज बांधवांचा मोर्चा शुक्रवारी येथील जिल्हा कचेरीवर धडकला. ...
सूर्य आग ओकत असून उन मी म्हणत आहे. पारा ४३ अंशावर पोहचला असल्याने दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. नागरिकांना प्रचंड तापमानाचा सामना करावा लागत असून पाणीटंचाईने कुलर काढण्याची सोय नाही. ...