मरता-मरता पंतप्रधानांच्या धोरणावर बोट ठेवून गेलेल्या या शेतकऱ्याची आत्महत्या शासकीय मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आली आहे. त्यामुळे त्याची अवघ्या १६ वर्षांची मुलगी रोज १५ किलोमीटर येणे-जाणे करून एका सराफा दुकानात मजुरी करतेय. ६ वर्षांचा मुलगा सतत आजारी ...
वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील वडगाव परिसरातील जंगलात शिरलेल्या सहा शिकाऱ्यांना वन विभागाने मोठ्या शिताफीने शनिवारी पहाटे जेरबंद केले. ...
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४३ गावे सहभागी झाली. सर्व गावांमध्ये श्रमदानातून गावे पाणीदार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता गटविकास अधिकाऱ्यांनी आधी श्रमदान नंतरच कार्यालयीन कामकाज सुरू गेल्याने ग्रामस्थांमध्ये हुरूप निर्माण झाला. ...
तूर खरेदी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून तीन हजार क्विंटल तूर दारव्हा बाजार समितीच्या यार्डमध्ये पडून आहे. चार हजार २६५ शेतकरी एसएमएस प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तत्काळ तूर खरेदीची मागणी आहे. ...
केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ...
अनुदानपात्र शाळांच्या यादीत जिल्ह्यातील एकाही उच्च माध्यमिक विद्यालयाचा शासनाने समावेश केला नव्हता. या अन्यायाविरुद्ध जिल्ह्यातील शिक्षकांनी थेट पुण्यात जाऊन तब्बल १२ दिवस भरउन्हात आंदोलन केले. ...
आयपीएल क्रिकेटचे सामने रंगात असून मोठ्या प्रमाणात सट्टा लावल्या जात आहे. गोपनीय माहितीवरून टोळीविरोधी पथकाने सूरजनगरातील सट्ट्यावर धाड टाकून एक लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख ९० हजार रुपये असून सटोड्याला अटक केली. ...
शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचा फटका येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसत आहे. शस्त्रक्रियेच्या उपकरणांचे निर्जंतुकीकरणासाठी पाणीच नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की मेडिकल प्रशासनावर आली आहे. ...
शहरातील वर्दळीच्या ठिकाणावर व्यावसायिकांनी केलेले अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे. एस.टी.बसस्थानकाच्या बाजुने जाणाऱ्या स्टेडियमवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर केलेली अवैध अतिक्रमणे बुलडोजरच्या साह्याने हटविण्यात ...