नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राळेगाव तालुक्याच्या वाऱ्हा येथील रेती घाटावर मारहाण, हवेत गोळीबार करून मशीन जाळल्या प्रकरणात मो. तारिक मो. शमी लोखंडवाला याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
पाणी फाऊंडेशच्या वॉटर कप स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून श्रमदानात पुढाकार घेणाऱ्या अवधूत भगवान वैद्य (२५) या नरसापूर येथील युवकाची एक्झीट सर्वांना चटका लाऊन गेली. त्याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले. ...
मुख्यमंत्र्यांच्या दत्तकगावात स्वत:चे सरण रचून आत्महत्या करणाºया माधव रावतेंचे मरण राज्यभरात चर्चेत असतानाच तालुक्यात आणखी एका कर्जबाजारी शेतकºयाने स्वत:ला जाळून घेतले. पहाटे ३ वाजता समाज साखरझोपेत असताना घरासमोर येऊन त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. ...
बोगस पगारपत्रक सादर करून ९० लाखांचा अपघातदावा मिळविण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, असा आदेश पांढरकवडा येथील न्यायाधीश आर.एन. जोशी यांनी दिला आहे. ...
अंजी(नृ) येथील भोयर नर्सिंग कॉलेजमध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. यात १८ जोडपी विवाहबद्ध झाली. या मेळाव्याचे आयोजन बळीराजा चेतना अभियानांतर्गत प्रियदर्शिनी सामाजिक बहुद्देशीय संस्था मोवाडातर्फे करण्यात आले होते. ...
जिल्ह्यातील अनेक भागात एमआरईजीएसची कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने अनेक मजुरांनी स्थानांतर केले आहे. हा प्रश्न शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मांडला आहे. ...
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या धनोडा येथील पैनगंगेच्या पात्रात मटका व जुगाराचे अड्डे खुलेआम सुरु आहे. याठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याबाबत गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. ...
जाती-धर्माच्या नावाखाली राष्ट्राचे ऐक्य शक्य नाही. राष्ट्राची एकात्मता टिकविण्यासाठी तसेच आपला आत्मसन्मान वाढविण्यासाठी ओबीसी अल्पसंख्यांकांसह सर्व समाजबांधवांनी आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरसेनानी आनंदराज आं ...
नैसर्गिक संपदेने नटलेल्या पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. कधी काळी धनदाट असलेल्या जंगलातून जाताना भीती वाटायची. परंतु अलिकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल विरळ होत चालले आहे. ...
२० टक्के अनुदान मंजूर झालेल्या सर्व शाळांना आणि तुकड्यांना पुढील टप्प्याचे अनुदान तातडीने देण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. ...