नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तालुक्यातील गणेशपूर पारधी तांडा येथील महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पंचायत समतीवर घागर मोर्चा काढून धडक दिली. यावेळी महिलांनी प्रचंड रोष व्यक्त करीत घागरी फोडून संताप व्यक्त केला. ...
सत्यमेव जयते वॉटर कपसाठी शिवनेरी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे घाटंजीत ‘भर दो झोली’ अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील मांडवा गावकºयांनी पाण्यासाठी संघाटितपणे प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थांची तळमळ, त्यांची मेहनत थक्क करणारी आहे. ...
ले-आऊटमधील विद्युतीकरणाच्या इस्टीमेटला मंजुरी देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली. ...
पाणीटंचाईची झळ माणसालाच नाही तर पशुपक्ष्यांनाही बसत आहे. असेच तहानेने व्याकूळ झालेल्या एका माकडाच्या पिलाच्या डोक्यात गडवा अडकल्याची घटना दिग्रस येथील होलटेकपुरा परिसरात शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता घडली. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ८० हजार किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील तब्बल १६ हजार सागवान वृक्ष अंतिम परवानगीशिवाय कापली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...
स्थानिक लोहारा एमआयडीसीतील जय अॅग्रो इंडस्ट्रीज या ट्रॅक्टर वर्कशॉपला गुरुवारी दुपारी आग लागली. या आगीत २५ लाखांचे नुकसान झाले. काम सुरू असताना अचानक येथील आॅईलने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. ...
तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत. ...
येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या धावंडा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीने केली आहे. त्यांनी अरुणावती प्रकल्प विभागाची चौकशीची मागणी केली आहे. ...
तालुक्यातील खडका येथील ग्रामस्थांनी गुरूवारी पाणीटंचाई निवारणासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढून धडक दिली. ...