येथील एका पेट्रोल पंपावर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. काही युवकांनी लगेच धाव घेऊन आग विझविली व दुचाकी पंपावरून ओढत रस्त्यावर नेली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३0 वाजता घडली. ...
मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले. ...
निवडणूक प्रक्रिया पुरूष मंडळीच पार पाडू शकते, हा गैरसमज महिलांनी गुरूवारी मोडीत काढला. महिलांनीच मतदान केंद्रावरील कामकाज चालविले. विशेष म्हणजे या ठिकाणची सुरक्षा व्यवस्थाही महिलांनीच सांभाळली. ...
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चार आणि वाशीममधील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर २२०६ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सायंकाळी ५ पर्यंत ५$४.७१ टक्के मतदान नोंदव ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी गुरुवारी ११ एप्रिल रोजी सरासरी ६२ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. सायंकाळी ५ पर्यंत ५३.९७ एवढी मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली. ...
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर यंत्रणेला पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याबाबत लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ...
येथील राळेगाव तालुक्यात असलेल्या झाडगाव येथे जिल्हा पं. केंद्राच्या शाळेतील बुथ क्र. २३७ वर आज मतदारांच्या रांगेत चक्क मुंडावळ््या बांधलेला एक तरुण उभा झाला. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (जेडीआयइटी) माजी विद्यार्थी अजिंक्य कोत्तावार याचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. देशातील सर्वाधिक १८ पेटंट्स एकहाती आपल्या नावावर करण्याचा विक्रम त्याने केला आहे. याबद्दल त्याला मुंबई येथे यूथ आयकॉन पुर ...