नागपूर-तुळजापूर मार्गावर महागाव तालुक्यातील बिजोरानजीक ट्रक व मॅक्स पिकअपची जोरदार धडक झाली. या अपघातात मॅक्स पिकअपमधील एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
चारदा खासदार राहिलेले आणि सलग १५ वर्षे निवडून येणारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसचे धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला पराभव म्हणजे, काँग्रेसला मिळालेला जनाधार समजला जात आहे. ...
धम्म चळवळीतील कार्यकर्ते आणि संस्थांचा सत्कार सोहळा येथील मेडिकल चौकातील जिल्हा परिषद बचत भवनात पार पडला. तिबेटियन लामा लोंबझ्यांग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पत्रकार विजय डांगे अध्यक्षस्थानी, तर चंदन तेलंग स्वागताध्यक्ष होते. ...
गुणवत्ता पूर्ण कार्यातून कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘लोकमत’च्या सखी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यात यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्के आणि सुषमा मोरे या दोन युवतींचा सन्मान करण्यात आला. ...
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या विद्यार्थ्यांसाठी आता यवतमाळ नगरपरिषद अद्ययावत अभ्यासिका केंद्र साकारत आहे. ही तीन मजली इमारत पूर्णपणे वातानुकूलित राहणार आहे. ...
आवश्यक कागदपत्रे नसलेल्या आॅटोरिक्षांवर वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाने शहरात शनिवारी धडक मोहीम राबवून २५ आॅटोरिक्षांवर कारवाई केली. याविरुद्ध आॅटोरिक्षा चालक-मालक व प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने बंद पुकारला होता. ...
जिल्ह्याला अनेक वर्षानंतर आयपीएस दर्जाचे अपर पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. नुरूल हसन यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरूवात केली. शनिवारी दुपारनंतर शहरातील चारही प्रमुख पोलीस ठाण्यांना भेट देऊन तेथील ठाणेदार व कर्मचा ...
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील चिरकुटा प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मासेमारी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या सभोवताल काही इसमांनी चक्क विषारी औषध टाकले आहे. ...
राज्यभरातील सव्वालाख अधिकारी, कामगारांना चांगले दिवस यावे यासाठी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. ...
शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये धार्मिक तथा ऐतिहासिक वारसा लाभलेले प्राचीन भानुतीर्थ कुंड आहे. मात्र हे कुंड दुर्लक्षित आहे. नगरपंचायतीने कुंडातील गाळ काढून डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...