स्वच्छतेचा ध्यास घेत नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरूवारी शहरातून स्वच्छता रॅली काढली. नगरपरिषदेने रॅलीसाठी पुढाकार घेतला. स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत शहरात स्वच्छतेचा संदेश देत ही रॅली निघाली. ...
जिल्हा कारागृहातून दररोज बाहेर पडणाऱ्या मालमत्तेच्या प्रकरणातील गुन्हेगारांवर सीआयडी (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग)चा वॉच राहतो. अशा सुटणाºयांची यादी थेट सीआयडीच्या पुणे मुख्यालयात महासंचालकांकडे पाठविली जाते. ...
शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. ...
सातव्या वर्गात शिकणाºया ‘अन्नपूर्णे’वर भिक्षा मागण्याची वेळ... ती सहावीपर्यंत शाळेत जात होती... पण नंतर शाळेत ‘शोभत’ नाही म्हणून तिला शाळेतच येऊ दिले जात नाही... ...
कोणत्याही क्षुल्लक प्रकरणांवरून उठसूट न्यायालयात धाव घेणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. ...