शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ...
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घर तेथे शौचालय अभियान राबविले जात आहे. गावातील स्वच्छता व सुंदरता वाढावी यासाठी पाथ्रड गोळे येथील किराणा व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढविली आहे. घरी शौचालय नसेल तर किराणाच मिळणार नाही, अशी अट त्याने घातली आहे. ...
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलपती असलेल्या महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या यवतमाळ दौऱ्याकडे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग आणि इलेक्ट्रिकल विभागाच्या संयुक्त विभागाने ‘नॅक व एनबीए एक्रेडिटेशन’वर सहा दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ...
नगरपालिका हद्दीत नव्यानेच समाविष्ट झालेल्या लोहारा परिसरातील नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या भागात यवतमाळ नगरपालिकेची शाळाच नसतानाही नागरिकांना शिक्षण कर आकारण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी यवतमाळात येत आहे. त्यानिमित्त नगरपरिषदेने नागपूर मार्गावरील अतिक्रमण काढले. यात मंगळवारी दुपारी तहसील चौक ते शनि मंदिर चौकापर्यंतच्या दुकानांचे शेड काढण्यात आले. ...
तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील दोन घरांना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत एक लाखापेक्षा जादा नुकसान झाले. मात्र नागरिकांनीच धावपळ करून ही आग आटोक्यात आणली. ...
यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे प्रथम प्राधान्य आहे. ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सर्वेक्षणे खूप झाली, आता अंमलबजावणीची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. ...
आर्णी तालुक्याच्या ज्या दाभडीत शेतकरी प्रश्नानावर मोदींनी चाय पे चर्चा केली, केंद्रात व राज्यात सत्ता मिळवली त्याच आर्णी तालुक्यातील दाभडी गावात विठ्ठल सवाई राठोड या शेतकऱ्याने २०१४ साली आत्महत्या केली. ...